(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amravati Murder Case : अमरावती खून प्रकरणात मोठा खुलासा, याआधी उमेश कोल्हेंच्या हत्येचा दोन वेळा प्रयत्न
अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. आता या हत्येच्या संदर्भात मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Amravati Murder Case : नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान खानला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आता या खून प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्येचा दोन वेळा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती अमरावती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
उमेश कोल्हे यांची हत्या प्रकरणात मोठा खुलासा करण्यात आला आहे. याआधी उमेश कोल्हे यांच्या हत्येचा दोन वेळा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तिसऱ्या प्रयत्नात त्यांची हत्या करण्यात आल्याचा खुलासा करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अमरावती पोलीस सूत्रांनी दिली आहे. चौकशीत असे आढळून आले की, 19 जून रोजी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी शोएब खान भुर्या हा त्याच्या एका साथीदारासह उमेशला मारण्यासाठी गेला होता. मात्र त्यावेळी तो थोडा घाबरला होता. त्यानंतर तो 20 तारखेला पुन्हा मारायला गेला, मात्र त्या दिवशी उमेश रात्री साडेनऊ वाजता दुकान बंद करुन लवकर घरी गेला होता. त्यामुळं उमेशचा जीव वाचला. त्यानंतर तिसऱ्यांदा म्हणजे 21 जून रोजी 5 लोक एकत्र गेले. तीन लोक बाईकवर होते. दोन लोक त्यांना उमेश कुठे पोहोचला याची माहिती देत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रकरण काय
नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान खानला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान खान हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. आजच केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचं ट्विट केलं आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या:
- अमरावती हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड इरफान खानला बेड्या, पोलिसांची मोठी कारवाई
- Amravati Irfan Khan: अमरावती हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान खान अटकेत ABP Majha