![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
इंदापुरात भीमा नदीत जलसमाधी मिळालेली बोट 17 तासांनी सापडली, 6 जण बेपत्ताच, मृत्यूची दाट शक्यता
इंदापुरात भीमा नदी पात्रात बुडालेल्यांना शोधण्यात अद्याप NDRF ला यश आलेले नाही. मात्र सहा प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत.
![इंदापुरात भीमा नदीत जलसमाधी मिळालेली बोट 17 तासांनी सापडली, 6 जण बेपत्ताच, मृत्यूची दाट शक्यता ujani bhima river drowned boat found after 17 hours in Indapur Six are still missing Maharashtra Marathi News इंदापुरात भीमा नदीत जलसमाधी मिळालेली बोट 17 तासांनी सापडली, 6 जण बेपत्ताच, मृत्यूची दाट शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/22/3ba2dd1dda11c567750b2cbec49e0508171635738759489_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर : सोलापुरातल्या उजनी धरणात (Solapur Ujani Boat) बुडालेली बोट सापडली आहे. 17 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बोस सापडली आहे. 35 फूट पाण्यात तळाशी ही बोट सापडल्याची माहिती समोर आली आहे, मात्र बुडालेल्यांना शोधण्यात अद्याप NDRF ला यश आलेले नाही. मात्र सहा प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत. बेपत्ता सहा प्रवासी दगावल्याची शक्यता आहे.
मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान उजनी जलाशयात जलवाहतूक करणारी बोट पाण्यात बुडाली होती. 17 तासानंतर बोट सापडली आहे. मात्र इतर सहा प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत. घटनेची माहिती समजताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोचले असून स्थानिक बोटींच्या मदतीने शोध सुरु करण्यात आला आहे. या बोटमध्ये असलेला एक जण पोहत बाहेर आल्याने घटना उघडकीस आली आणि त्यानंतर बचावकार्य सुरु झालं.
सोलापूर जिल्ह्यातील कुगाव ते इंदापूर अशी बोट वाहतूक सुरु असताना ही दुर्घटना घडली होती.. बोट बुडत असताना बोटीतून प्रवास करणारे पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरेंनी पाण्यात उडी मारली आणि कळाशी गावाचा काठ गाठला. या घटनेची माहिती आमदार दत्तात्रय भरणेंही घेतली असून सध्या शोधमोहीम सुरु आहे.. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. निंबाळकर NDRF टीम सोबत जलाशयात उतरले आहेत. प्रशासकीय अधिका-यांकडून त्यांनी अगोदर घटनेचा आढावा घेतला.
नेमकं काय घडले?
करमाळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील कळाशी दरम्यान जलवाहतूक करणारी बोट सायंकाळी सहाच्या दरम्यान सुगाव येथून कळाशीकडे उजनीच्या जलाशयातून जात होती . सायंकाळी अचानक वादळी वारा सुरु झाल्याने कळाशीच्या बाजूला पोहचत असताना बोट पाण्यातच उलटली . या बोटीत करमाळा तालुक्यातील झरे येथील एक दाम्पत्य व त्यांची दोन लहान मुले , कुगाव येथील एक तरुण , एक बोट चालक आणि राहुल डोंगरे नावाचे पोलीस उपनिरीक्षक होते. बोट बुडू लागताच पोलीस अधिकारी डोंगरे यांनी पाण्यात उडी घेऊन पोहत कळाशी गावाचा काठ गाठला व स्थानिकांना बोट बुडाल्याची सूचना दिली. सहा पैकीएकाही प्रवाशाचा शोध लागलेला नाही . दरम्यान इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे देखील घटनास्थळी पोचले असून मदतकार्यात सहभागी झाले आहेत .
पाण्यात बुडालेल्या सहा जणांची नावे समोर
दरम्यान, या दुर्घटनेत बुडालेल्या प्रवाशांची नावे समोर आली आहेत. गोकुळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल दत्तात्रय जाधव (वय 25) शुभम गोकुळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकुळ जाधव (वय 3) (सर्व रा.झरे ता.करमाळा), अनुराग अवघडे (वय 35) गौरव धनंजय डोंगरे (वय 16 दोघे रा.कुगाव ता.करमाळा) अशी पाण्यात बुडालेल्या सहा जणांची नावे आहेत.
Video :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)