एक्स्प्लोर

UDID Card : दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ

Disability Welfare : महाराष्ट्र शासनाने विशेष सहाय्य अनुदान योजनांचा लाभ घेणाऱ्या आणि UDID वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

मुंबई : राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष सहाय्य अनुदान योजनांचा लाभ घेणाऱ्या, पण अद्याप UDID (Unique Disability ID) अर्थात वैश्विक ओळखपत्र नसलेल्या लाभार्थ्यांना हे कार्ड काढण्यासाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत त्यांचे अनुदान पूर्ववत सुरू ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

कोणतेही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत

मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, UDID कार्ड अनिवार्य केल्यानंतर अनेक दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान तांत्रिक कारणांमुळे थांबले होते. त्यामुळे कोणताही पात्र लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने ही मुदतवाढ दिली आहे.

1 एप्रिल 2026 पूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना यांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

15 जूनपर्यंत अर्ज करण्याचे निर्देश

शासनाने सर्व पात्र लाभार्थ्यांकडून 15 जून 2026 पर्यंत स्वावलंबन पोर्टलवर UDID कार्डसाठी अर्ज करून घेण्याचे आदेश दिले आहेत. अर्ज क्रमांक SAS पोर्टलवर अद्ययावत करण्याचे तसेच आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

तहसीलदारांना विशेष समन्वयाची जबाबदारी

जुन्या वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या आधारे लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना 30 सप्टेंबर 2026 पर्यंत UDID कार्ड मिळावे यासाठी तहसीलदारांना आवश्यक समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गावनिहाय लाभार्थी यादी प्रसिद्ध करून अपात्र किंवा बनावट लाभार्थी वगळण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

प्रत्येक तिसऱ्या गुरुवारी दिव्यांगांसाठी शिबिरे

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी दिव्यांगांसाठी विशेष शिबिरे आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांवर सर्व संबंधित विभागांचा समन्वय साधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाही या मोहिमेचा नियमित आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Embed widget