एक्स्प्लोर

कासव होईन, पण धरणात लघुशंका करणारा अजित पवार होणार नाही : उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मी कासव व्हायला तयार आहे, पण मी धरणात लघुशंका करणारा अजित पवार होणार नाही, अशा शब्दात ठाकरेंनी अजित पवार यांचा समाचार घेतला. ते जालन्यात बोलत होते.

जालना : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मी कासव व्हायला तयार आहे, पण मी धरणात लघुशंका करणारा अजित पवार होणार नाही, अशा शब्दात ठाकरेंनी अजित पवार यांचा समाचार घेतला. ते जालन्यात बोलत होते. शिवसेनेच्या वाघाची शेळी,गांडूळ आणि आता कासव झाला असून शिवसेना आता मान आत घालून बसली आहे. त्यामुळे शिवसेना आता काहीच करु शकत नाही, अशी बोचरी टीका अजित पवारांनी काल शनिवारी हल्लाबोल मोर्चाच्या समारोपावेळी औरंगाबादमध्ये केली होती. अजित पवारांच्या या टीकेचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मी शेळी,गांडूळ ,ससा,कासव व्हायला तयार आहे मात्र धरणात लघुशंका करणारा अजित पवार व्हायला तयार नाही, तसंच धरणात लघुशंका करणाऱ्या अजित पवारांना कालवा आणि धरणाच्या आजूबाजूला फिरकू देऊ नका अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांचा समाचार घेतला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जालना जिल्ह्यातील घनसावंगीमध्ये शेतकरी मेळावा घेतला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारसह राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. औरंगाबादमध्ये पैठणमधील सभेतही उद्धव यांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाचा समाचार घेतला. आधी डल्ला मारणाऱ्यांनी आता हल्ला करु नये, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चावर टीका केली आहे. मराठवाड्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यानिमित्त ते आज पैठणमध्ये बोलत होते.  पैठणमध्ये शरद सहकारी साखर कारखान्याचा गळित हंगामाचा उद्घाटन कार्यक्रम झाला. आम्ही एकटेच लढणार आणि जिंकणार असं सांगत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं. शिवाय 2019 नंतर भाजप सत्तेत राहणार नाही असं सुतोवाचही त्यांनी केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Collapse New Video : घाटकोपर होर्डिंग कोसळतानाचा आणखी एक थरारक व्हिडीओGhatkopar Hoarding Special Report : वारा..पाऊस आणि अपघात..मुंबई नगरीत मृत्यू कोसळला ABP MAJHADevendra Fadnavis on Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी होणार, फडणवीसांची माहितीGhatkopar Hoarding : पेट्रोल भरायला आला आणि  काळाने घाला घातला...घाटकोपर दुर्घटनेत तरुणाचा मृत्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
Embed widget