Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर अज्ञातांनी फाडले; बुलढाणा मोताळा रोडवरील घटना
Buldhana News: उद्धव ठाकरे हे आजपासून बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर काही अज्ञातांनी फाडले असल्याचे समोर आले आहे.
Buldhana News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजपासून बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana) जनसंवाद दौऱ्यानिमित्त 22 आणि 23 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बुलढाणा दौऱ्यावर असणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्याच्या दरम्यान उद्धव ठाकरे 5 जनसंवाद सभा घेणार आहेत. त्यापैकी तीन सभा आज बुलढाण्यातील चिखली, मातोळा, जळगाव जामोद येथे होणार आहे. त्यानिमित्या उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर काही अज्ञातांनी फाडले असल्याचे समोर आले आहे.
चिखली येथील सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे बुलढाणा (Buldhana News) मार्गे मोताळा येथील आयोजित सभेसाठी जाणार आहेत. त्याच बुलढाणा मोताळा रोडवरील बालाजी मंदिराजवळ लावण्यात आलेले स्वागताचे असंख्य बॅनर काही अज्ञात व्यक्तीने फाडले असल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे, या सर्व बॅनरवरील केवळ जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांचेच फोटो फाडल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणामुळे पुन्हा राज्याचे राजकारण तापण्याची शक्यता बाळवली आहे.
स्वागतासाठीचे लावलेले बॅनर अज्ञातांनी फाडल्याने
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अशात ठाकरे गटाकडून देखील लोकसभेची तयारी केली जात आहे. मात्र, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे यंदा उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक एवढी सोपी नसणार आहे. त्यामुळे आता स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला बुलढाणा जिल्ह्यात सध्याघडीला एकही उबाठाचा खासदार आणि आमदार नाही. बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रताप जाधव हे शिवसेना एकत्र असताना सहा वेळा निवडून आले आहेत. मात्र आता ते शिंदे गटात गेले असल्याने बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा उद्धव ठाकरे यांना ताकद पणाला लावावी असल्याचे चित्र आहे. त्या अनुषंगाने स्वतः उद्धव ठाकरे पक्ष बळकटीसाठी जनसंवाद दौरा आयोजित करत आहेत. असे असतांना काही अज्ञातांनी शहरात लावलेले स्वागतासाठीचे बॅनर फाडल्याने नवा वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आता आम्ही काय काय फाडणार हे लक्षात ठेवा - अंबादास दानवे
बॅनर फाडल्याच्या प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी संतप्त प्रतिक्रिया देत विरोधकांवर निशाण साधला आहे. त्यावेळी ते म्हणाले की, तुम्ही आज आमचे बॅनर फाडले. आज तुमची वेळ आहे, उद्या आमची वेळ येईल. त्यावेळी आम्ही काय काय फाडणार हे लक्षात ठेवा. असा घाणाघात दानवे यांनी विरोधकांवर करत या प्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. सोबतच पोलिसांनी देखील यात लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. पुढे ते म्हणाले, सरकार कोणाच्या बापाचे नसते. सरकार हे जनतेचे आहे, जनता तुम्हचे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. शासन आपल्या दारी मध्ये हे सरकार गाव खोड्याच्या दारी गेले तर कळून येईल सिंचन, पिण्याच्या पाण्याची समस्या आजही या मतदार संघात कायम आहे. त्यामुळे या गोष्टीकडे सरकारने लक्ष देणे सोडून असल्या भ्याड गोष्टी करण्यात ऊर्जा खर्च करत असल्याचा टोला देखील अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या