राजकारण नको रे बाबा! स्वतःच्या जिद्दीनं 'त्यांनी' कमावलं ऐश्वर्य, राजकारणाचा नाद लागला अन्...
Mahadev Tatke : वाशिमचे महादेव ताटके एकेकाळी धनाड्य समजले जाणारे व्यक्तिमत्व होते. मात्र राजकारणापाई त्यांना कोट्यावधीची संपत्ती गमावावी लागली आहे.
Mahadev tatke : हल्लीच राजकारण (Politics) हे सोयीच म्हणून ओळखले जाते. मात्र, राजकारणात अपयश आले की, कसे होत्याच नव्हतं होतं. त्याच उदाहरण म्हणजे वाशिमचे महादेव ताटके. राजकारणापाई कोट्यावधीची संपत्ती गमावून रस्त्यावर येण्याची वेळ ताटके यांच्यावर आली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या...
वाशिमच्या (Washim News) मंगरूळपीर येथील महादेव ताटके हे सध्या अडगळीत पडल्यासारखे जीवन जगत आहेत. त्या मागील कारण म्हणजे राजकारण होय. महादेव ताटके एकेकाळी धनाड्य समजले जाणारे व्यक्तिमत्व होते. रोजगाराच्या शोधात त्यांनी मुंबई गाठली. बांधकाम व्यवसायात त्यांनी भरारी घेतली आणि हजारो, लाखो नव्हे तर करोडो रुपयांची कमाई करून त्यांनी आपलं नाव कमावलं. गरिबीची जान असणारे महादेव ताटके यांना समाजसेवा करण्याचा विचार आला आणि मुंबई सोडून परत गावी आले. समाजकारण करत राजकारणाचा विचार सुरु केला आणि तिथेच त्यांच्या जीवनाचा उलट प्रवास सुरु झाला.
विधानसभा निवडणूक लढवण्याचा घेतला निर्णय
2009 ची विधानसभा निवडणूक लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यासाठी कार्यकर्त्यांना ७५ मोटारसायकल भेट दिल्या. तीन टाटा चारचाकी वाहन ही वाटप केले. अन्नधान्य, खते, बी बियाणे, साड्या चोळीचे वाटप आणि दीड लाख वॉटर बॅगचेही वाटप त्यांनी केले. पान भरून जाहिराती देऊ लागले. मंत्री, राजकारणी, समाजसेवक यांच्या भेटीगाठी होऊ लागले. मंगरूळपीर नगरपालिका, पंचायत समितीमध्ये आपली माणसे निवडणुकीत उभी करून निवडून आणली.
निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लागली उतरती कळा
लोकांचा जमावडा वाढला. 2009 ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. 20 हजार 645 मतं मिळवत ते तिसऱ्या क्रमांकावर आले. निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र राजकारणात यशस्वी होण्याच्या नादात आर्थिक ताळमेळ न साधता आल्याने ताटके यांना आर्थिक परिस्थिती हातची गमवावी लागली आणि आज ते 50-100 रुपयांसाठी मोहताज झाले आहेत.
ज्यांना मदत केली तेच आता पाठ फिरवतात
दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ताटके यांची ओळख होती. मात्र, राजकारणात केलेल्या खर्चातून त्यांना सर्व गमवावे लागले. कार्यकर्तेही त्यांच्यापासून दुरावले. ताटके यांनी ज्यांना मदत केली तेच पाठ फिरववतात. असे त्यांच्या ओळखीतील मदत करणारे सांगतात, अशी माहिती नंदलाल पवार यांनी दिली आहे.
दरम्यान, हल्ली राजकारण करताना संपत्तीसह सिम्पती, पद असले की, सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे होतात. मात्र, एक वेळा संपत्ती आणि सिम्पती गेली की माणूस कसा देशोधडीला लागतो त्याचे हे ज्वलंत उदाहरण म्हणावे लागेल.
आणखी वाचा
मोठी बातमी : एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं, खासदार सून रक्षा खडसेंचं आवाहन, लोकसभेपूर्वी धमाका करणार?