एक्स्प्लोर

Uddhav Thackeray on Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच नागपुरात अन् टप्प्यात चंद्रशेखर बावनकुळे; ठाकरेंनी अशी कोपरखळी मारली की बाजूची लोकं हसू लागली!

Uddhav Thackeray on Chandrashekhar Bawankule : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एकाचवेळी प्रवेश करत होते. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी बावनकुळे यांची भेट झाली.

नागपूर : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session 2023) आज (11 डिसेंबर) तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackearay) सुद्धा नागपुरात पोहोचले. विधान भवन मुख्य प्रवेशद्वारावर एक वेगळाच योगायोग घडला. महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यापासून भाजपचा एक दिवस चुकला नसेल, किंवा उद्धव ठाकरे यांचा सुद्धा एक क्षण चुकला नसेल जेव्हा टीका केलेली नाही. मात्र, यामध्ये टीकाटिप्पणी करणारे दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची आज (11 डिसेंबर) विधान भवन मुख्य प्रवेशद्वारावर भेट झाली. नेमकी हीच संधी साधतच ठाकरी बाण सोडण्याची संधी उद्धव ठाकरे यांनी दवडली नाही. 

जेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले, “काय एकटेच जाता..?” (Uddhav Thackeray on Chandrashekhar Bawankule)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एकाचवेळी प्रवेश करत होते. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी बावनकुळे यांची भेट झाली. त्यावेळी ठाकरेंनी बावनकुळेंना (Uddhav Thackeray on Chandrashekhar Bawankule) मिश्किलपणे कोपरखळी मारली. “ काय एकटेच जाता..?” ठाकरे यांनी मकाऊ प्रकरणावरून बावनकुळेंना कोपरखळी मारल्याने बाजूला असलेल्या लोकांच्या कानावर हा डायलाॅग जाताच एकच हशा पिकला. मकाऊ दौऱ्यात (Chandrashekhar Bawankule Macao visit) बावनकुळे यांचा कथित जुगार खेळताना फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बावनकुळेंवर हल्लाबोल केला होता. 

उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल 

दरम्यान, आज तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी कामकाजात सहभाग घेतल्यानंतर शिंदे फडणवीस सरकावर तोफ डागली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांवर वारंवार एकामागोमाग एक संकटं येत आहेत. विमा कंपन्यांनी आपली दारं खिडक्या बंद केली आहेत, कर्ज वसुलीसाठी बॅंका मागे लागल्या आहेत. काही शेतकरी अवयव विकायला आले होते, अशी टीका त्यांनी केली. 

सत्ताधारी पक्षाकडून गुंडगिरी 

उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्ष गुंडगिरी करत असल्याचा आरोप  केला. ते म्हणाले की, पत्रांचा जमाना आहे निवडणुक आयोगाला पत्र दिलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. या पत्राचं आम्ही स्वागत करतो. जो न्याय नवाब मलिकांना तोच प्रफुल्ल पटेल यांना लागणार का? असा सवाल त्यांनी भाजपला केला. मोदी यांनी स्वतः बीकेसीमधील सभेत कुछ लोक मिरची का व्यवहार करते है, आता त्यांच्यावर कारवाई करणार का? असाही टोला त्यांनी भाजपला यावेळी बोलताना लगावला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात; घोंगडी सभा घेऊन बारामती पिंजून काढली, सांगता सभेला एकाच मंचावर येणार का? म्हणाले...
सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात; घोंगडी सभा घेऊन बारामती पिंजून काढली, सांगता सभेला एकाच मंचावर येणार का? म्हणाले...
Chandrapur Crime: डीजेमध्ये नाचण्याच्या वाद विकोपाला, पाच युवकांनी एकाला भोसकलं; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाला गालबोट; चंद्रपूर हादरलं!
डीजेमध्ये नाचण्याच्या वाद विकोपाला, पाच युवकांनी एकाला भोसकलं; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाला गालबोट; चंद्रपूर हादरलं!
Maharashtra Live Blog Updates: आदित्य ठाकरे यांना शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा देणार?, वर्धापनदिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता 
Maharashtra Live Blog Updates: आदित्य ठाकरे यांना शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा देणार?, वर्धापनदिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता 
Sahar Shaikh Mumbra AIMIM: कैसा हराया...सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात; निवडणूक लढवताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल, नेमकं प्रकरण काय?
कैसा हराया...सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात; निवडणूक लढवताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : 600 बनावट शिक्षकांची भरती अन् कोट्यवधींचा पगार लाटला; शालार्थ घोटाळ्यात 48 अधिकाऱ्यांना एसआयटीची नोटीस
600 बनावट शिक्षकांची भरती अन् कोट्यवधींचा पगार लाटला; शालार्थ घोटाळ्यात 48 अधिकाऱ्यांना एसआयटीची नोटीस
Sahar Shaikh Mumbra AIMIM: कैसा हराया...सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात; निवडणूक लढवताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल, नेमकं प्रकरण काय?
कैसा हराया...सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात; निवडणूक लढवताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल, नेमकं प्रकरण काय?
4000 कोटींच्या 'रामायण'चा 'तो' अभिनेता, ज्याला 8 वर्षांपूर्वी कोणी ओळखतंही नव्हतं; मग 1200 कोटींच्या फिल्ममधून देशभरात गाजला, अन् मानधनच घेतो 100 कोटी
4000 कोटींच्या 'रामायण'चा 'तो' अभिनेता, ज्याला 8 वर्षांपूर्वी कोणी ओळखतंही नव्हतं; मग 1200 कोटींच्या फिल्ममधून देशभरात गाजला अन्...
Rupali Chakankar On Ashok Kharat Case: बहिणीची 8 तास चौकशी, आता रुपाली चाकणकर मनातलं सगळं बोलून गेल्या, 28 दिवसांनी काय काय म्हणाल्या?
बहिणीची 8 तास चौकशी, आता रुपाली चाकणकर मनातलं सगळं बोलून गेल्या, 28 दिवसांनी काय काय म्हणाल्या?
CSK Vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
Prasad Oak Manjiri Oak Daughter In Law: प्रसाद ओकची सूनबाई मारवाडी, साखरपुड्यात घडलेला प्रसंग सांगताना मंजिरी ओक म्हणाली...
प्रसाद ओकची सूनबाई मारवाडी, साखरपुड्यात घडलेला प्रसंग सांगताना मंजिरी ओक म्हणाली...
Donald Trump : अमेरिका इराण यांच्यातील तणाव कमी होणार? इराणसोबत दोन दिवसात चर्चा शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा दोन दिवसात शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
Gold Rate : सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
Embed widget