Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates : आजपासून हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा, अवकाळीचा मुद्दा गाजण्याची शक्यता
Winter Session 2023 LIVE: आजपासून हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होतोय. आज राज्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानासंदर्भात चर्चा होणार आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी चर्चेची मागणी केलेली.
LIVE
Background
Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates: नागपूर : आजपासून उपराजधानी नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होतोय. आज राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासंदर्भात विधानसभेत चर्चा होणार आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चर्चेची मागणी केली होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चर्चेचा निर्णय घेतला. तर अवकाळीग्रस्तांच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
नागपुरात (Nagpur) सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session 2023) आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खंडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्द्यावरुन अधिवेशाचे दोन दिवस सभागृहांमध्ये गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार हे पाहणं जास्त गरजेचं ठरेल. तसेच आज विधीमंडळावर अनेक मोर्चे देखील धडकणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस हा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
अवकाळीच्या मुद्द्यावर चर्चा होणार
नागपुरातसध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी हिवाळी अधिवेशनावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.आज विधानसभेत अवकाळी पावसावर चर्चा होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या चर्चेचा निर्णय देणार आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या चर्चेची मागणी केली होती. त्याच प्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मुद्द्यावर चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. या चर्चासत्रामध्ये विरोधक अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.
विधीमंडळावर मोर्चे धडकणार
अनेक मुद्द्यांवर आज नागपुरात मोर्चे जाम असणार आहेत. आजचा सर्वात प्रमुख मोर्चा हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा असणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमी वरून निघणारा मोर्चा विधिमंडळापर्यंत जाऊन सभेत रूपांतरित होईल. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय बडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते सहभागी होतील. धनगरांच्या आरक्षणासाठी सकल धनगर समाज समन्वय समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमाती मधून आरक्षण देण्यात यावा तसेच धनगर मेंढपाळांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीसाठी विदर्भवादी आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जुनी पेन्शन लागू करावी, शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नये या मागणीसाठी मोर्चा काढला जाणार आहे.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहणार
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे हे अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे कोणत्या मुद्द्यावर सरकारला घेरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE: संजय राऊतांवर बोलताना प्रसाद लाड आक्रमक; जीभ घसरली
Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE: संजय राऊतांवर बोलताना प्रसाद लाड आक्रमक झाले आहेत. संजय राऊत सातत्यानं माझा आणि माझ्या कंपनीचा उल्लेख करत आहेत, असं म्हणत प्रसाद लाड यांनी राऊतांवर थेट टीकास्त्र डागलं.
प्रसाद लाड म्हणाले की, "संजय राऊत चुXX झालाय. ज्या गोष्टीचा संबंध नाही, कोणत्या माहितीचा आधार नाही. कशामध्ये नाव घ्यायचं, कशात नाही घ्यायचं, हे कळत नाही. अशा माणसाला हीच संसदीय भाषा वापरली पाहिजे.", असं प्रसाद लाड म्हणाले.
"आपल्या माध्यमातून मी संजय राऊत यांना सांगू इच्छितो, याच्यापुढे त्यांनी माझं किंवा माझ्या कंपनीचं नाव घेतलं, तर स्वप्नातला संजय राऊत काय आहे? हे मी मीडिया समोर आणेल. त्याचे व्हिडीओ जनतेसमोर आणेल आणि मी माझ्या वकिलांशी चर्चा करून, अब्रु नुकसानीचा किमान 200 ते 500 कोटींचा दावा संजय राउतांवर उद्या सकाळपर्यंत दाखल करतोय.", असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.
"उधळलेल्या रेडकू असतो, ना त्याला भाल्यानं मारायचं असतं. आणि म्हणून त्या रेडकुला भाल्यानं मारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आक्रमकपणा आला आहे. ज्यानं मेहनतीनं उभं केलेलं साम्राज्य, खोटारड्यापणामुळे त्याला डाग लागत असेल, तर छत्रपतींनी दिलेली शिकवण आहे, 'अंगावर आलं तर, घ्यायचं शिंगावर'", असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.
Hiwali Adhiveshan 2023 : मराठा आरक्षणावरुन शिवसेनेचे दोन 'शेठ' जुंपले; पाहा कोण कोणास काय म्हणालं...
Hiwali Adhiveshan 2023 : आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मराठा आरक्षाच्या मुद्द्यांवरून भरतशेठ आणि भास्करशेठ यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेनेचे दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. पाहुयात नेमकं कोण काय म्हणालं...
भास्कर जाधव : राज्य सरकराच्या हातात ठराव करण्याशिवाय काहीच उरलं नाही. शिंदे साहेब प्रयत्न करत आहेत, पण ते शक्य नाही. कारण केंद्राच्या हातात सर्व आहे, देवेंद्र फडणवीसांनी मनात आणलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असं म्हणत भरत गोगावलेंना भास्कर जाधवांनी डिवचलं.
अशातच याचमुद्द्यावर भास्कर जाधव यांना प्रतित्तुर देण्यापासून भरत गोगावले स्वतःला रोखू शकले नाहीत. ते म्हणाले की, मी भास्कर जाधवांच्या मताशी सहमत नाही. एकनाथ शिंदे हे आरक्षण देणारच. यांचा अभ्यास चांगला आहे, पण आम्ही पण समितीत आलो आहोत, आमचा पण अभ्यास आता झालेला आहे.
Winter Session 2023: आता गॅरंटीचा जमाना, पंतप्रधान मोदीसुद्धा गॅरंटी देत असतात 'मोदी गॅरंटी' : उद्धव ठाकरे
Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE: हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 2019 लासुद्धा केंद्र सरकारनं जेव्हा 370 कलम हटवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आम्ही आमच्या पक्षाकडून त्याला पाठिंबा दिला होता. जो निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला, याचं आम्ही स्वागत करतो.
"महत्त्वाचं म्हणजे, 2024 सप्टेंबर पर्यंत काश्मीरमध्ये निवडणुका घ्याव्यात, असंसुद्धा सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. त्यामुळे त्यापूर्वी जर पाकव्याप्त काश्मीर जर आपण घेऊ शकलो, तर संपूर्ण काश्मीरमध्ये निवडणुका होतील.", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"आता गॅरंटीचा जमाना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा गॅरंटी देत असतात 'मोदी गॅरंटी'", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींसह भाजपवर निशाणा साधला.
"आता पुढील वर्षीच्या होऊ घातलेल्या निवडणुकांपर्यंत ज्या काश्मीर पंडितांना काश्मीर सोडून आपलं घरदार सोडून देशभरात जावं लागलं होतं. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना महाराष्ट्रात आसरा दिला होता. त्या देशभरात पसरला सर्व काश्मिरी पंडितांना काश्मीरात आणण्याची गॅरंटी मोदी देतील का? जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीत ते मोकळ्या वातावरणात काश्मीरमध्ये मतदान करू शकतील.", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE: मुंबई गोवा महामार्गावरील अपघाती मृत्यूंचा आकडा 2 हजार पार, सरकारची लेखी उत्तरात कबुली
Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE: मुंबई गोवा महामार्गावरील अपघाती मृत्यूंचा आकडा 2 हजार पार
सरकारची लेखी उत्तरात कबुली
गेल्या 10 वर्षांत 1 हजार 685 अपघातांत 2 हजार 010 नागरिकांचा मृत्यू
Uddhav Thackeray, Aaditya Thackeray: उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहणार, ठाकरे कोणत्या मुद्यावरुन सरकारला घेरणार?
Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE: हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे हे अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे कोणत्या मुद्द्यावर सरकारला घेरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.