'मी हुडी घालून, गॉगल लावून फिरत नाही', उद्धव ठाकरेंचा दिल्लीत जाऊन देवेंद्र फडणवीसांना टोला
कधीतरी चेहरा ठरवावा लागेल, कोणीतरी निमंत्रक, समन्वयक ठरवावा लागेल. आजच्या बैठकीत आम्ही समन्वयक ठरवणार, असे शिवसेना उद्धव ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
नवी दिल्ली : इंडिया आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. देश वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. माझ्यासमोर कोणतीही स्वप्न नाहीत. जनता ठरवेल ते आम्ही करणार आहे. कधीतरी चेहरा ठरवावा लागेल, कोणीतरी निमंत्रक, समन्वयक ठरवावा लागेल. आजच्या बैठकीत आम्ही समन्वयक ठरवणार, असे शिवसेना उद्धव ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी नाक पुसताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) टोमणा मारला. मी कोणाची स्टाईल मारत नाही. सर्दी झाली आहे, उगीच हुडी, गॉगल घालून फिरत नाही, असे ठाकरे म्हणाले. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. यापूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीला अनेक प्रादेशिक पक्ष होते. 'तीन राज्यांच्या निवडणुकांच्या पराभवाबाबत चर्चा होणार आहे. पुढलं वर्ष निवडणुकांचं आहे. इंडिया आघाडी मजबूत करु मग नवीन पक्षांना सोबत घेण्याची तयारी करु. पंतप्रधान नरेंद्र मोदी समोर चेहरा हा प्रश्न असला तरी आमच्या आघाडीला एका समन्वयकाचा विचार करावा लागेल.
माझ्यासमोर कोणतीही स्वप्न नाही, जनता जे ठरवेल ते आम्ही करू : उद्धव ठाकरे
इंडिया आघाडीच्या सामनाच्या अग्रलेखावर उद्धव ठाकरे म्हणाले, सामनाच्या अग्रलेखाचा अर्थ असा आहे की, घोडामैदान जवळच आहे. सगळं सैन्य जमलं आहे मात्र एकत्रितपणे पुढे जाण्यासाठी एक समन्वयक हवा आहे. प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याची वेळ आली आहे. सगळे जण आपापल्या राज्यात व्यस्त असतात, आम्ही सगळ्यांशी बोलू आमि मग ठरवू की समन्वयक कोण माझ्यासमोर कोणतीही स्वप्न नाही, जनता जे ठरवेल ते आम्ही करू, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
माझं मत मी बैठकीत सांगेल : उद्धव ठाकरे
महविकास आघाडीचा चेहरा शरद पवार योग्य वाटतात या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणतात की, माझं मत मी बैठकीत सांगेल. आता सांगून गैरसमज करू इच्छित नाही.
आज इंडिया आघाडीची बैठक
इंडिया आघाडीची आज दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये दुपारी 3 वाजता बैठक होणार आहे. बैठकीत जागावाटपावर होणार चर्चा होणार आहे. मोदींना शह देण्यासाठी 'मैं नही, हम' चा नारा घोषित होणार. तसंच उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्या इंडिया आघाडीत समावेशावर करणार चर्चा होणार आहे.
हे ही वाचा :