(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray : महाराष्ट्रात मतं मिळवायला ब्रँड ठाकरेच लागतो! अमित शाह-राज ठाकरेंच्या दिल्लीतील भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचलं
Uddhav Thackeray : महाराष्ट्रात मत पाहिजे असतील तर मोदी या नावाने मतं मिळणार नाही. ठाकरेंच्या नावाने महाराष्ट्रात मतं मिळतात. आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
Uddhav Thackeray : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) मनसेची भाजपसोबत महायुती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीवर जोरदार टीका केली आहे.
राज ठाकरे हे सोमवारी संध्याकाळी अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना घेऊन विमानाने दिल्लीच्या (Delhi) दिशेने रवाना झाले. अमित शाह आणि राज ठाकरेंची मंगळवारी बैठक झाली. या भेटीदरम्यान राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अमित शाह यांची 'वन टू वन' चर्चा झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप (BJP) आणि मनसे (MNS) एकत्र येणार अशी जोरदार चर्चा रंगली असताना उद्धव ठाकरेंनी या भेटीवर निशाणा साधला आहे.
आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न
अर्धापूर येथे झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांना आता असे कळले आहे की, महाराष्ट्रात मत पाहिजे असतील तर मोदी या नावाने मत मिळणार नाही. ठाकरेंच्या नावाने महाराष्ट्रात मत मिळतात. म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) फोटो चोरला. काही फरक पडत नाही. आता आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. घेऊन जा, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) केली आहे. यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करत आहे की, नुसते जल्लोषात राहू नका, आपण 100 टक्के जिंकणारच आहोत. पण जिंकण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय जिंकता येणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीचे जागा वाटप जवळपास पूर्ण
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचे जागा वाटप (Mahavikas Aghadi Seat Sharing) जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या एक-दोन दिवसात त्याची अधिकृत घोषणा होईल. संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरत आहे. पण या जागा वाटपामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवावे लागेल की, कुठल्याही परिस्थितीत आपल्याला चूक करून चालणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या