(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काँग्रेसकडून जागावाटपाचा प्रस्तावच नाही, राष्ट्रवादीसोबत जवळपास मिटलं; उद्धव ठाकरेंनी थेटच सांगितलं
काँग्रेसच्या प्रमुखांकडून अजून जागावाटपाचा कोणताही प्रस्ताव नाही, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे. तर राष्ट्रवादीशी जागावाटपाचं जवळपास निश्चित, तर वंचितबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
Uddhav Thackeray on India Allince Seat Sharing: मुंबई : राम मंदिर (Ram Mandir) लोकार्पणाच्या सोहळ्याला जाणार की, नाही याबाबत कोणतीही स्पष्टता उद्धव ठाकरेंनी दिलेली नसली, तरी अयोध्येत जाण्यासाठी आपल्याला कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही, 22 जानेवारी हा काही एकमेव अयोध्येत जाण्याचा मुहूर्त नाही, आपण याआधीही दोनदा अयोध्येत गेलेलो आहोत. त्यामुळे आपण कधीही अयोध्येला जाऊ शकतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरही टीका केलेली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) वकील आहेत, त्यांनी लखनौ केस वाचावी, म्हणजे, या संपूर्ण आंदोलनातील शिवसेनेचा सहभाग त्यांना कळेल, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत.
काँग्रेसच्या प्रमुखांकडून अजून जागावाटपाचा कोणताही प्रस्ताव नाही, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे. तर राष्ट्रवादीशी जागावाटपाचं जवळपास निश्चित, तर वंचितबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
30 एप्रिलपर्यंत रिझल्ट लागला तरच तुमचं काहीतरी होईल : उद्धव ठाकरे
"माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका 30 एप्रिलच्या आत करतील. त्यांना कोणीतरी सांगितलं आहे की, 30 एप्रिलपर्यंत रिझल्ट लागला तरच तुमचं काहीतरी होईल, असं माझ्या कानावर आलं आहे. महाविकास आघाडीतील जागावाटप सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी सुरळीत झालेली आहेत, ज्यावेळी इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक पार पडली, त्यावेळी काँग्रेससोबतही बोलणं झालं. त्यावेळी माझ्यासोबत संजय राऊत होते. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशीही याबाबत सविस्तर बोलणं झालं. त्यामुळे सर्वकाही सुरळीत होणार आहे. इथे जे काही बोललं जात आहे, त्यावर विश्वास ठेवू नका, कारण असा कोणताही निरोप मला त्यांच्याकडून आलेला नाही.", असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
इंडिया आघाडीत मी बिघाडी होऊ देणार नाही : उद्धव ठाकरे
"माझ्यात आणि इंडिया आघाडीत मी बिघाडी होऊ देणार नाही. मी कोण काय बोलत आहे, याकडे लक्ष देणार नाही, जोपर्यंत काँग्रेस अध्यक्ष किंवा पक्षश्रेष्ठी माझ्याशी याबाबत बोलत नाही, तोपर्यंत मी किंवा माझ्यासोबतचे इतरही याबाबत भाष्य करणार नाही.", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पाहा व्हिडीओ : Uddhav Thackeray Full PC : अयोध्या निमंत्रणाचा तिढा ते आघाडीतीलजागावाटपाची पिडा - उद्धव ठाकरे UNCUT
महत्त्वाच्या इतर बातम्या :