एक्स्प्लोर

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांना मोठा धक्का! अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश

Yavatmal News : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांना मोठा धक्का देण्यात आला आहे. शिंदे गटाचे (Shiv Sena) नेते आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी हा राजकीय धक्का दिला आहे.

Yavatmal News यवतमाळ : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांना मोठा धक्का देण्यात आला आहे. शिंदे गटाचे (Shiv Sena) नेते आणि पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांनी हा राजकीय धक्का दिला आहे. खासदार संजय देशमुख यांच्या अनेक युवक समर्थक आणि कार्यकर्त्यांनी मंत्री संजय राठोड यांच्या समक्ष शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश घेतला आहे. दिग्रस (Digras) येथील विश्रामगृह येथे राठोड यांच्या उपस्थितीत या शेकडो युवकांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश घेतलाय.

खासदार संजय देशमुख यांच्या दिग्रस शहरातील गवळीपुरा परिसरातील युवकांचा व मुस्लिम बांधव, कार्यकर्ते यांचा यात समावेश आहे. तर दुसरीकडे, नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांच्याबद्दल शिवसेना ठाकरे गटात नाराजी असल्याने प्रवेश घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

दिग्रस मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढणार 

आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकारणात मोठे फेरबदल होतांना दिसत आहेत. अशातच गेल्या दोन दिवसांपूर्वी नेर तालुक्यातही खासदार संजय देशमुख यांच्या समर्थकानी साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राठोड यांच्या समक्ष मुंबई येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यात बाजार समितीचे आणि  मध्यवर्ती बँकेचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य यांचा समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिग्रस मतदारसंघात ताकद वाढवण्याचा मंत्री राठोड यांचा प्रयत्न आहे. परिणामी त्याचेच एक पाऊल हे असल्याचे बोलले जात आहे. 

वनी विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना ठाकरे गटाची गटबाजी उघड 

असाच एक प्रकार यवतमाळच्या वनी विधानसभा क्षेत्रामध्ये दिसून आला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाची गटबाजी वनी विधानसभा क्षेत्रामध्ये देखील उघडपणे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी लावलेल्या बॅनरवर  वनी विधानसभा अध्यक्ष संजय देरकर यांचा फोटो लावण्यात आला नाही. तर संजय दरेकर यांनी लावलेल्या बॅनर वरून माजी आमदार विश्वास नांदेकर यांचा फोटो गायब करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये या गटबाजीचा मोठा . फटका शिवसेना ठाकरे गटाला बसणार असल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, या चढाओढीत कार्यकर्ते आणि पदाधिकारी या गटबाजीमुळे संभ्रमात पडले आहे. संजय दरेकर आणि विश्वास नांदेकर यांचे गृहयुध्द उघडपणे दिसून आले आहे. विश्वास नांदेकर हे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि विधानसभेचे आमदार होते. तर संजय दरेकर यांनी 2021 मध्ये शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश घेतला होता. यानंतर त्यांना वनी विधानसभा अध्यक्ष पदाचे पद देण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे.  यानिमित्त वनी शहरांमध्ये मोठमोठे बॅनर लावण्यात आले. या बॅनर वरून शिवसेना ठाकरे गटाची जी गटबाजी आहे ती आज उघडपणे दिसून आली असून जिल्ह्यात आज हा चर्चेचा विषय ठरत आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
Ajit Pawar : अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
Katrina Kaif Visited Pakistan: कतरिना कैफ गुपचूप पाकिस्तानला जाऊन आली, तिकडे कोणाला भेटली? लाहोरमधील 'तो' फोटो व्हायरल
कतरिना कैफ गुपचूप पाकिस्तानला जाऊन आली, तिकडे कोणाला भेटली? लाहोरमधील 'तो' फोटो व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Full Speech Anna Bansode : पुरी हो गयी दादा की तमन्ना उपाध्यक्षपद पर बैठ गये अण्णाRam Kadam on Disha Salian : ठाकरेंची चौकशी करा, राम कदम आक्रमक; Nana Patole भिडले थेट सभात्याग केलाAjit Pawar on Anna Bansode : आण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, कौतुक करता करता गुपितच फोडलं!ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 26 March 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
Ajit Pawar : अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
Katrina Kaif Visited Pakistan: कतरिना कैफ गुपचूप पाकिस्तानला जाऊन आली, तिकडे कोणाला भेटली? लाहोरमधील 'तो' फोटो व्हायरल
कतरिना कैफ गुपचूप पाकिस्तानला जाऊन आली, तिकडे कोणाला भेटली? लाहोरमधील 'तो' फोटो व्हायरल
आम्ही मरावं का? चाचांचं लग्न पाहून व्हायरल फोटोवर तरुणांचा कमेंटचा पाऊस, नव्या नवरीच्या सौंदर्याचं कौतुक! Video
आम्ही मरावं का? चाचांचं लग्न पाहून व्हायरल फोटोवर तरुणांचा कमेंटचा पाऊस, नव्या नवरीच्या सौंदर्याचं कौतुक! Video
पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक नाही, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही : संभाजीराजे
पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक नाही, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही : संभाजीराजे
Warren Buffett : भारतात सोनं लाखाच्या घरात, पण जगातील अब्जाधीश वाॅरेन बफे सोन्यामध्ये गुंतवणूक का पसंत करत नाहीत?
भारतात सोनं लाखाच्या घरात, पण जगातील अब्जाधीश वाॅरेन बफे सोन्यामध्ये गुंतवणूक का पसंत करत नाहीत?
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
Embed widget