Uddhav Thackeray : पंतप्रधान मोदी घराणेशाही नको म्हणातात, मग राणेंची घराणेशाही तुम्हाला चालते? राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर असून आज त्यांनी राणे पिता - पुत्रांचा बालेकिल्ला म्हणजे कणकवलीतून त्यांच्यावर निशाणा साधला.
कणकणवली : पंतप्रधान मोदी (Narendra Modi) म्हणतात, आम्हाला घराणेशाही नको, मग राणेंची घराणेशाही तुम्हाला चालते, असा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नारायण राणे (Narayan Rane), नितेश राणे (Nitesh Rane) आणि निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या बालेकिल्ल्यात उपस्थित केला. उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. तसेच रविवार 4 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांनी कणकवलीत सभा घेतली. यावेळी त्यांना नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावर निशाणा साधला.
पंतप्रधान येथे आले आणि पाणीबुडी प्रकल्प गुजरातला नेला. आम्हाला वाटलं इथे येऊन काही महाराष्ट्र किनारपट्टीला देतील, पण असं काही झालं नाही. तुमचं गुजरात प्रेम गुजरात पुरतंच ठेवा. गुजरातवर संकट आलं तेव्हा तुम्ही कुठे होता, असा सवाल देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकलं असून सध्या ते कोकण दौऱ्यावर आहेत.
तुम्ही भाजपमुक्त श्रीराम म्हणा - उद्धव ठाकरे
अटल बिहारी वाजपेयी यांना बाळासाहेबांनी साथ दिली. आता त्यांच्याच मुलाल तुम्ही राजकारणातून संपवायला निघालात? त्यामुळे हे श्रीराम म्हणतायत, तुम्ही भाजपमुक्त श्रीराम म्हणा, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
हुकुमशाहीची दिशा मोडून काढायची आहे - उद्धव ठाकरे
मी तुम्हाला सांगतो ही दिशा हुकुमशाहीची आहे, ही मोडून काढायची आहे. ज्याला खड्याच पडायचं त्यांनी खुशाल पडा. ज्यांना हुकुमशाही नको असेल त्यांनी आमच्यासोबत या. ते म्हणत अबकी पार 400 पार नारा तुम्ही द्या. अब की बार भाजप तडीपार हा नारा आम्ही देऊ, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरेंना मंत्रीपद दिलं तर काय झालं? - भास्कर जाधव
ठाकरेंच्या 4 पिढ्यांनी तुम्हाला एवढी पदे दिली. त्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना पद दिलं तर मग काय झालं? असा सवाल उपस्थित करत भास्कर जाधव यांना भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे मु्ख्यमंत्री झाल्यावर यांच्या पोटामध्ये कळ उठली आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरुन खाली ओढलं. त्यांना आजही मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच करायचा आहे. त्यामुळे आम्ही सन्मानाने त्या पदावर उद्धव ठाकरे यांना बसवल्याशिवाय शांत बसणार नाही, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं.