Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणतायत, 'अजित पवारांबाबत मला खात्री, ...कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा त्यांच्याकडे'
Uddhav Thackeray on Politics : उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्यासोबत अडीच वर्ष काम केल्यामुळे त्यांच्या स्वभाव माहित असल्याचंही ठाकरे म्हणाले आहेत.
Uddhav Thackeray on Ajit Pawar : शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांचं कौतुक करत मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत अडीच वर्ष काम केल्यामुळे त्यांच्या स्वभाव माहित आहे, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे. विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी विविझ मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
अजित पवारांबद्दल उद्धव ठाकरेंना खात्री
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अजित पवारांबाबत (Ajit Pawar)) मोठं वक्तव्य करत त्यांच्याबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी ते म्हणाले की, ''अजित पवारांनी अडीच वर्ष सोबत काम केलं आहे, त्यामुळे त्यांच्या स्वभावाची कल्पना आहे आणि मला खात्री आहे की, बाकीच्यांचे सत्तेसाठी डावपेच सुरु असले तरी, त्यांच्याकडून (अजित पवार) राज्यातील जनतेला वेळेवर मदत मिळते. कारण, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा त्यांच्याकडे देण्यात आल्या आहेत.'' अजित पवार पुन्हा अर्थमंत्री झाल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
'नागरिक त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका'
नव्या शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारबाबत (Shinde-Fadnavis-Pawar) प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे की, ''सरकारनं राज्यासाठी चांगलं काम करावं. सध्या जी काही सत्याची साठमारी चालली आहे. त्याच्यामध्ये राज्यातील प्रश्न, आता काही ठिकाणी पाऊस लागलेला आहे आणि ठिकठिकाणी पुराचं पाणी भरत आहे. शेतकरी आधी पाऊस नसल्याने हवालदिल होता आता अतिवृष्टीमुळे हवालदिल होण्याची शक्यता आहे. या सर्व साठमारीमुळे आपला मूळ शेतकरी, राज्याचा नागरिक त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, एवढी विनंती.''
पाहा व्हिडीओ : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अजित पवारांच्या भेटीला
'महाराष्ट्रातली जनता मूर्ख नाही'
सध्याच्या राजकारणाबाबत ठाकरे म्हणाले की, ''सत्तेची खेळी न समजण्याएवढी महाराष्ट्रातली जनता मूर्ख नाही, हा डोळे नसलेला आंधळा ध्रूतराष्ट्र नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र आहे. त्याचामुळे जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा मी शुभेच्छा दिल्या आहेत. नांदा सौख्य भरे.''
'देशप्रेमी आणि लोकशाही प्रेमी पक्षांची एक आघाडी'
प्रसारमाध्यमाशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या 'इंडिया' (INDIA) आघाडी बाबतही वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, 'देशप्रेमी आणि लोकशाही प्रेमी पक्षांची एक आघाडी स्थापन झाली आहे आणि या आघाडीचं नाव इंडिया असं आहे.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :