एक्स्प्लोर

Uddhav Thackeray VIDEO : आजूबाजूला खुर्ची, ठाकरेंची एन्ट्री, अवघडलेले शिंदे, विधानभवनातील फोटोसेशनची A TO Z कहाणी

Vidhan Bhavan Photo Session : उद्धव ठाकरे हे फोटोसेशनसाठी आले आणि देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे उभे राहिले. त्यानंतर जे घडलं त्यावर आता जोरदार चर्चा सुरू आहे.

मुंबई : जेवढी चर्चा फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरची होतेय, तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त चर्चा ही आज विधिमंडळात झालेल्या फोटोसेशनची होतेय. फोटोसेशनच्या निमित्तानं संगीत खुर्चीच पाहायला मिळाली. फोटोसेशनच्यावेळी अनपेक्षितपणे उद्धव ठाकरे आले आणि एकनाथ शिंदेंची गोची झाल्याचं पाहायला मिळाले. कारण उद्धव ठाकरेंना बसण्यास ऑफर करण्यात आलेली खुर्ची ही शिंदेंच्या बाजूची होती. त्या दरम्यान जे काही घडत होतं त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं.

अंबादास दानवेंनी फोटोसेशनसाठी उद्धव ठाकरेंना बोलावलं. उद्धव ठाकरे आले, मात्र बसायचं कुठे असा प्रश्न होता. खरं तर योग हा शिंदेंच्या बाजूला बसण्याचा होता. मात्र जसजसे उद्धव ठाकरे पुढे येत होते. तसे एकनाथ शिंदे हे राम शिंदेंचा हात पकडून त्यांना खुणावत होते. नीलम गोऱ्हेंनी देखील उद्धव ठाकरेंना शिंदेंच्या बाजूला बसण्यास सांगितलं. मात्र उद्धव ठाकरेंनी ते टाळलं, ते नीलम गोऱ्हेंच्या बाजूला बसले. विशेष म्हणजे यावेळी एकनाथ शिंदेंची देहबोली बरंच काही सांगून गेली. सगळ्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला, हस्तांदोलन केलं. मात्र शिंदेंनी ठाकरेंशी नजरानजरही टाळली.

नेमकं काय घडलं?

फोटोसेशनसाठी 10 खुर्च्या रांगेत सज्ज होत्या. वक्तशीरपणासाठी ओळखले जाणारे अजितदादा सर्वात पहिले पोहोचले. खुर्च्यांवरची नाव वाचून ते स्थानापन्न झाले. अजितदादांनंतर सगळे नेते हळूहळू फोटोसेशनसाठी गोळा होऊ लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आले. त्यानंतर बावनकुळे, चंद्रकांतदादा, नीलम गोऱ्हेही आल्या. ज्यांना निरोप द्यायचा होता ते अंबादास दानवेही आले.

फडणवीसांच्या आग्रहाखातर शिंदेंच्या खुर्चीवर दानवे बसले

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील फोटोसेशनला उपस्थित राहिलं पाहिजे अशी अंबादास दानवेंची तळमळ स्पष्ट दिसत होती. मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंना सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. फडणवीसांच्या शेजारची खुर्ची एकनाथ शिंदेंची होती. मात्र फडणवीसांच्या आग्रहाखातर अंबादास दानवे तिथे बसले. मग एन्ट्री झाली विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची.

शिंदे धावत पळत आले

राहुल नार्वेकरांसाठी अंबादास दानवेंनी खुर्ची मोकळी करून दिली. थोडासा उशीर झालेल्या एकनाथ शिंदेंच्या धावपळीमुळे फोटोसेशनला संगीत खुर्चीचं स्वरूप प्राप्त झालं. त्यांनी राम शिंदेंच्या बाजूची खुर्ची पकडली.

नीलम गोऱ्हे, एकनाथ शिंदे, राम शिंदे, देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, अजित पवार, अंबादास दानवे, अण्णा बनसोडे, चंद्रकांत पाटील... फ्रेम रेडी होती, फोटो क्लिक होणार होता. मात्र त्याआधी अंबादास दानवेंची इच्छा पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचले.

ठाकरे आल्यानंतर खुर्चीचा प्रश्न

उद्धव ठाकरे त्या ठिकाणी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह सर्वजन उभे राहिले. त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि राम शिंदेही उभे राहिले. काही जणांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. पण प्रश्न होता की उद्धव ठाकरेंना बसण्यासाठी कुणाच्या बाजूची खुर्ची द्यायची?

शिंदेंनी नजरानजर टाळली

आधी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेच्या खुर्चीच्या दिशेनं पुढे सरकत होते. तेवढ्यात राम शिंदेंचा हात पकडून खुणावताना एकनाथ शिंदेंना कॅमेऱ्यानं कैद केलं. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे... फूट नव्हे काही इंचाचं अंतर होतं. मात्र प्रत्यक्षात मनातला दुरावा पराकोटीचा होता.

फोटो क्लिक झाला, माघारी फिरण्यासाठी गडबड

शिंदेंनी ठाकरेंशी नजरानजर टाळली. नीलम गोऱ्हेंनी देखील ठाकरेंना शिंदेंच्या बाजूच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली. मात्र उद्धव ठाकरे शिंदेंऐवजी गोऱ्हेंच्या बाजूला बसले.

या सगळ्यात शेवटी एकदाचा फोटो क्लिक झाला. सगळे नेते माघारी फिरू लागले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांकडे गेले, त्या ठिकाणी राहुल नार्वेकरही होते. उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी काही संवाद साधला. त्याचवेळी काही अंतरावर असलेले शिंदे हे ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वकरांशी बोलत होते. या दोन्ही नेत्यांचे हे क्षण कॅमेरात कैद होत होते.

शेवटी उद्धव ठाकरेंनी निरोप घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना नमस्कार केला, बावनकुळे आणि राहुल नार्वेकरांशी हात मिळवला. शेवटी ते निघून गेले.

ठाकरे बिनधास्त, शिंदे अवघडलेले

ज्यावेळी उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्याजवळ आले त्यावेळी शिंदेंच्या चेहऱ्यावर मात्र काहीसं टेन्शन असल्याचं दिसून आलं. शिंदेंनी आपल्या दोन्ही हाताने चश्मा नीट करत वेळ मारून नेली. मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे मात्र बिनधास्त दिसत होते. त्यांनी शेजारी बसलेल्या नीलम गोऱ्हे यांच्याशी गप्पा मारल्या, भाजपच्या नेत्यांशी संवाद साधला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी

व्हिडीओ

Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Embed widget