एक्स्प्लोर
प्रतापगडावर उदयनराजेंकडून सहकुटुंब भवानी मातेचं दर्शन

सातारा : नवरात्रीच्या निमित्ताने छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्नी दमयंतीराजे भोसले आणि दोन मुलांसह प्रतापगडावरील भवानी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी देवीचं पूजन आणि होम हवन करण्यात आलं. या कार्यक्र्माच्या निमित्ताने अनेकांनी या राजघराण्यातील कुटुंबाला एकत्र पहाण्यासाठी गर्दी केली होती. उदयन राजेंसोबतच छत्रपतींची पुढची पिढी म्हणजे उदयनराजेंची कन्या नयनतारा राजे भोसले आणि त्यांचे थोरले सुपुत्र वीरप्रतापराजे हे कुठेही न थांबता गडावरील थेट मंदिरात पोहचले. मंदिरात शिवरायांनी स्थापन केलेल्या भवानी मातेचं पूजन आणि होम हवन करण्यात आले. छत्रपती शिवरायांना देवीचं दर्शन गडावर घेता यावे म्हणून ही देवी खास दगड आणुन बनवली गेली आहे. सकाळी सकाळी हा संपूर्ण प्रतापगड ढगांमध्ये आणि धुक्यात पुरता हरवून गेला होता. छत्रपती उदयन राजेंना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पाहण्यासाठी मोठी गर्दी गडावर झाली होती. शिवाय याठिकाणी आलेल्या पर्यटकांना तर उदयनराजेंसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. उदयनराजेंच्या अनेक पैलूंमुळे ते कायमच चर्चेत असतात, देवीच्या पूजना निमित्ताने उदयनराजेंना सहकुटुंब पाहण्याचा अनुभव अनेकांनी घेतला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























