एका पदासाठी एकाच दिवशी दोन आदेश आणि दोघांकडेही अतिरिक्त कार्यभाराचे आदेश; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये अधिकारांवरून सुप्त संघर्ष!
आता एकाच दिवशी दोन अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याने कोणाच्या आदेशाचे पालन करायचं असं सुद्धा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात संघर्ष दिसून येत आहे.

Devendra Fadnavis and Eknath Shinde: गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये होत आहे. इतकेच नव्हे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई ते दिल्ली वाढलेल्या गाठीभेटी सुद्धा यामध्ये चर्चा वाढवणाऱ्या ठरत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष समोर आला आहे. एकाच पदासाठी एकाच दिवशी दोन आदेश आणि दोघांकडे अतिरिक्त कार्यभाराचा आदेश देण्यात आल्याने या दोन्ही नेत्यांमध्ये सूप्त संघर्षाची ही नांदी आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विभाग खातं आहे. मात्र, या दोन्ही विभागांकडून एकाच पदासाठी दोन आदेश काढण्यात आल्याने राज्य सरकारचा सावळागोंधळ समोर आला आहे. त्यामुळे नेमका हा सावळागोंधळ आहे की दोघांमध्ये सुक्त संघर्षाची ही नांदीच आहे असं सुद्धा बोलले जात आहेत.
कोणाच्या आदेशाचे पालन करायचं असं सुद्धा प्रश्न
बेस्ट महाव्यवस्थापक पदासाठी अतिरिक्त कार्यभार बीएमसीच्या दोन अतिरिक्त अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याने गोंधळ वाढला आहे. नगरविकास विभागाने काढलेल्या आदेशात आश्विनी जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याचे आदेशात नमूद करण्यात आलं आहे. मात्र, दुसऱ्या सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आलेल्या आदेशामध्ये आशिष शर्मा यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याचे म्हटलं आहे. आता एकाच दिवशी दोन अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याने कोणाच्या आदेशाचे पालन करायचं असं सुद्धा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात अधिकाऱ्यांवरून सुप्त संघर्ष असल्याचे यावरून या समोर येत आहे.
एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर
दुसरीकडे आज एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर पोहोचले आहेत. आज (6 ऑगस्ट) दुपारी त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बैठक होणार आहे, तर सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा भेट घेणार आहेत. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांनी पक्षांतरावरून केलेल्या वक्तव्यावर सुद्धा शिंदे गटांमध्ये खळबळ उडाल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत का? अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. या संदर्भाने आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली असता, त्यांनी म्हटलं आहे की, कुछ बडा होनेवाला है ही महाराष्ट्राच्या अनुषंगाने राहुल गांधी यांची भूमिका नसून तर दिल्लीत होणार असल्याचे म्हणत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मुख्यालय दिल्लीत असल्याने ते दिल्लीमध्ये भेटीगाठी करत असावेत असा टोला सुद्धा लगावला होता.
इतर महत्वाच्या बातम्या























