![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Prataprao Jadhav : ठाकरे गटातील दोन खासदार आणि आठ आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत येणार, खासदार प्रतापराव जाधवांचा दावा
ठाकरे गटातील दोन खासदार आणि आठ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत येतील असा खळबळजनक दावा बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केलाय.
![Prataprao Jadhav : ठाकरे गटातील दोन खासदार आणि आठ आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत येणार, खासदार प्रतापराव जाधवांचा दावा Two MPs and eight MLAs from the Thackeray group will join Eknath Shinde Shiv Sena says MP Prataprao Jadhav Prataprao Jadhav : ठाकरे गटातील दोन खासदार आणि आठ आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत येणार, खासदार प्रतापराव जाधवांचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/13/306e320d90826eed6241ea146bbd5d1c1691928025483339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MP Prataprao Jadhav : लवकरच ठाकरे गटातील दोन खासदार आणि आठ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत येतील असा खळबळजनक दावा बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांनी केलाय. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ते खासदार आणि आमदार नेमके कोणते अशी चर्चा सुरु झालीय.
आमदार आणि खासदारांची नावे सांगण्यास जाधवांचा नकार
ठाकरे गटातील दोन खासदार आणि तब्बल आठ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा प्रतापराव जाधवांनी केलाय. ते लवकरच शिंदे यांच्या शिवसेना सोबत येतील असे जाधव म्हणाले. त्यामुळं आता ठाकरे गटात मोठ खिंडार पडणार का? दोन खासदार आणि तब्बल आठ आमदार शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत क? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे खासदार आणि आमदार नेमके कोण? त्यांची नावे सांगणे खासदार प्रतापराव जाधव यांनी जाणीवपूर्वक टाळले आहे. मात्र, खासदार प्रतापराव जाधव यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
मागील वर्षी 40 आमदारांसह एकनाथ शिंदेंनी केलं होतं बंड
मागील वर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी शिवसेनेत बंड केले. या सर्वांनी थेट गुवाहाटी गाठली होती. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर '50 खोके एकदम ओके' या घोषणेची सर्वसामान्यांमध्ये जोरदार चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिंदे गटातील आमदारांनी 50 कोटी रुपये घेऊन बंड केलं असा आरोप सातत्याने करत आहेत. यानंतर विधानपरिषदेच्या काही आमदारांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. तसेच शिवसेना नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी हे सुद्धा शिंदेच्या शिवसेनेत दाखल झाले होते. त्यानंतर 13 खासदारांनी शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता आणखी दोन खासदार आणि आठ आमदार शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्यानं ठाकरे गटाची चिंचा वाढण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)