एक्स्प्लोर

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण, आंदोलन मागे

मात्र शासनाने आश्वासन पूर्ण केलं नाही, तर पुढील आंदोलन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोर करणार असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.

नागपूर : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य केल्याने आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त यांच्या बैठकीत दोन मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली. प्रकल्पग्रस्तांच्या गावातील अत्यावश्यक सोयी त्वरित सुरु करण्यात येतील आणि गोसेखुर्द धरणातील पाण्याची पातळी कमी करण्यासंदर्भातली मागणी मान्य करण्यात आली आहे. तसंच प्रकल्पग्रस्त आणि शासकीय अधिकारी यांची संयुक्त समिती संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करेल आणि 15 दिवसात अहवला सादर झाल्यानंतर सरकार अंतिम निर्णय घेणार आहे. मात्र शासनाने आश्वासन पूर्ण केलं नाही, तर पुढील आंदोलन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोर करणार असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला. मान्य झालेल्या दोन मागण्या 1) गावातल्या बंद पडलेल्या अत्यावश्यक सोयी लगेच सुरु केल्या जातील 2) गोसेखुर्द धरणाची पाणी पातळी जी सध्या 243.85 मीटर एवढी वाढवली आहे, ती कमी करण्याचे प्रयत्न केले जातील. आमदार निवासाचा ताबा प्रलंबित मागण्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी काल (20 ऑक्टोबर) दुपारपासून आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात नागपूरच्या आमदार निवासाचा ताबा घेतला.संतप्त आंदोलनकांनी काल गच्चीवरुन पाण्याची टाकी खाली टाकली आणि दगडफेकही केली. सरकार मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आंदोलक आमदार निवासातच राहतील अशी भूमिका आमदार बच्चू कडू यांनी घेतली होती. नागपूरच्या आमदार निवासात काल बैठक बोलावली असता, त्यात मोर्चा काढण्याचं ठरलं. मात्र जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त दोघेही नसल्यामुळे नंतर आमदार निवासच आंदोलनाचं ठिकाण बनलं. सरकारकडून चर्चेसाठी आमंत्रण यानंतर आज सरकारकडून आमदार निवासावर ताबा घेतलेल्या गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना चर्चेसाठी बोलावणं आलं आहे. या चर्चेसाठी आमदार बच्चू कडू रवाना झाले आहेत. नागपूर, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीत वाद राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त यांच्यात बैठकीत जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही ग्रामस्थांना बैठकीतून बाहेर काढलं.नागपुरात आज बावनकुळे यांच्यासोबत गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली. या बैठकीत नागपूर जिल्ह्यातल्या टेकेपार गावातल्या ग्रामस्थांचा चंद्रशेखर बावनकुळेंसोबत वाद झाला. हा वाद इतका वाढला की बावनकुळेंनी काही ग्रामस्थांना बैठकीच्या बाहेर काढलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget