गाभाऱ्याला टेकू, शीळांना तडे; तुळजाभवानी मंदिराचं मुख्य शिखर खाली उतरवणार? तुळजापुरात नक्की काय घडतंय?
Tuljapur: तुळजाभवानी मंदिरात देवीच्या गाभाऱ्यात शीळांना तडे गेले आहेत. गाभाऱ्याला बीमचा तात्पुरता आधार देण्यात आलाय. आता मुख्य शिखराला अधिक धोका आहे.

Dharashiv: श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याला धोका निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता मंदिराचे मुख्य शिखर खाली उतरवावे लागणार का? असा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिरातील जुन्या दगडी शिळांना मोठे तडे गेल्यामुळे गाभारा आणि शिखराला धोका असल्याचे राज्य पुरातत्त्व विभागाच्या पाहणीत समोर आले आहे. त्यामुळे मंदिर प्रशासन, पुरातत्त्व विभाग आणि भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (Tuljabhavani Temple)
तुळजाभवानी मंदिर हे राज्यातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत आहे. सध्या देवीच्या गाभाऱ्याला लोखंडी बीमचा तात्पुरता आधार देण्यात आला असून, मुख्य शिखरात धोका अधिक वाढल्याने राज्य पुरातत्त्व विभागाने शिखर उतरवण्याबाबत प्राथमिक अहवाल दिला आहे.
पुरातत्त्व विभागाचे आतापर्यंत दोन अहवाल
दरम्यान, केंद्रीय पुरातत्त्व विभागाने आतापर्यंत दोन स्वतंत्र अहवाल सादर केले असून, यात तात्पुरती डागडुजी करून संरचना सुरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, मंदिर संस्थान या उपाययोजनांवर समाधानी नसून, कायमस्वरूपी उपायाची मागणी करत आहे. यासंदर्भात तिसरा आणि अंतिम अहवाल आल्यानंतरच शिखर उतरवण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मंदिर संस्थांचे विश्वस्त आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे.
मुंबईत उच्चस्तरीय बैठक होणार
या पार्श्वभूमीवर लवकरच मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असून, मंदिर संस्थेचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी याबाबत दुजोरा दिला आहे. मंदिराच्या शिखरावर झालेल्या संभाव्य कारवाईमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही शिखर उतरवण्याच्या चर्चेला मंदिरातील पुजारी वर्गाने तीव्र विरोध केला होता. त्यामुळे पुढील निर्णय अत्यंत संवेदनशीलपणे घेण्यात येणार आहे.सध्या गाभाऱ्यात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी नियंत्रण ठेवण्यात आले असून, भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचीच वाट पाहावी, असे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे.
गाभाऱ्याच्या शिळांना तडे
तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्याच्या काही प्राचीन शेळ्यांना तडे गेल्याची बाब पुरातत्व विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत उघड झाली होती. मंदिर गाभार्यातील फरशी व मुलांना दिलेला भाग काढून टाकल्यानंतर काही शिळा खचले आहेत तर काहींना तडे गेले आहेत .तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्याच्या जतन व संवर्धन म्हणजेच जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व विभागाच्या निग्रणीखाली सुरू असताना हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली.
























