एक्स्प्लोर
कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचाऱ्याला टेम्पोने चिरडले
नागेश चौधरी या पोलीस कर्मचाऱ्याला लातूर - नांदेड महामार्गावर कर्तव्य बजावत असताना एका आयशर टेम्पोने धडक दिली. या धडकेत चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
लातूर : नागेश चौधरी या पोलीस कर्मचाऱ्याला लातूर - नांदेड महामार्गावर कर्तव्य बजावत असताना एका आयशर टेम्पोने धडक दिली. या धडकेत चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी 8:30 च्या सुमारास ही घटना घरणी या गावाजवळ घडली आहे. याप्रकरणी टेम्पो चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस नाईकपदी असलेले नागेश चौधरी हे लातूर - नांदेड या महामार्गावर जड वाहनांची तपासणी करीत होते. दरम्यान, एम.एच. 03 सी. पी 3450 या भरधाव टेम्पोने त्यांना पळून जाण्याच्या उद्देशाने धडक दिली. यामध्ये नागेश चौधरी हे रोडवर पडले असताना टेम्पो चालकाने त्यांच्या अंगावर टेम्पो घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
टेम्पोखाली चिरडल्याने चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला असून तपासणीसाठी त्यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक तरडे हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान चौधरी यांना धडक देणाऱ्या टेम्पो चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement