एक्स्प्लोर

आशिया खंडातील सर्वात मोठ्या गुफेत 'कचारगड' यात्रा सुरू; 18 राज्यातून भाविक गोंदियात दाखल

राज्यातीलच नाही तर देशातील महत्वाची समजली जाणारी गोंदिया जिल्ह्यातील कचारगड यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेला 18 राज्यातून आदिवासी बांधव गोंदियात दाखल होत आहे.

गोंदिया : आदिवासी समाजाचे उगमस्थान समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात कचारगड येथील यात्रेला सुरुवात झाली आहे. दरवर्षी ही यात्रा कोयापुणेम पौर्णिमेला भरत असते. या यात्रेकरिता तब्बल 18 राज्यातून आदिवासी बांधव एकत्रित येऊन गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या आराध्य देवतेचे दर्शन करून आपली संस्कृती जपत आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत रोटी-बेटी व्यवहारासह अन्य खूप उपक्रम राबवले जातात. विशेष म्हणजे ज्या गुफेत ही जत्रा भरते ती आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा असल्याचाही दावा केला जातो. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात सध्या आदिवासी बांधवाचे पवित्र व श्रद्धा स्थान मानल्या जाणाऱ्या कचारगड येथे कचारगडची यात्रा सुरु आहे. अत्यंत दुर्गम व निसर्गाचा सानिध्यात असलेल्या या ठिकाणी ही यात्रा पाच दिवस चालते. याच कचारगडच्या गुफेतूनच आदिवासी बांधवचा उगम झाला, अशी आख्यायिका आहे. कचारगड येथे दोन नैसर्गिक गुफा आहेत. त्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या गुफा असल्यचा दावा केला जातो. जवळपास पाच हजार लोक या गुफेत एकाच वेळेस दर्शन घेऊ शकतात. आदिवासी बांधव दरवर्षी आद्य पौर्णिमेला उपस्थित होऊन आपल्या आराध्य देवतेचे दर्शन घेत असतात. तसेच लाखोंच्या संख्येने उपस्थित होऊन आपली संस्कृती जोपासतात. या यात्रेकरिता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छतीसगड, आंध्र प्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड, उतर प्रदेश मिझोरम आदी राज्यातून लाखो भाविक येतात व आपल्या आराध्य दैवत म्हणजे "पारी कोपार लींगो"चे दर्शन या ठिकाणी घेतात. त्याचप्रमाणे विविध राज्यातील विभिन्न आदिवासी बांधव आपआपल्या राज्यातील नृत्य देखील या कोयापुणेम यात्रेदरम्यान सादर करतात. तसेच पाच दिवस चालणाऱ्या यात्रेत असंख्य आदिवासी बांधव या यात्रेत सामील होतात. विदर्भातील मामा-भाचे यात्रा; नववर्षाच्या पहिल्या दिवशी घनदाट जंगलात भरतो उत्सव या यात्रेदरम्यान कोयापुनम अधिवेशन देखील आयोजित करण्यात येत असून या अधिवेशनादरम्यान आदिवासी लोकांची संस्कृती, परंपरा, बोली-भाषा, रीतीरिवाज, नृत्यकला यांचे प्रदर्शन देखील करण्यात येते. तसेच या यात्रेत आदिवासी बांधव रोटी-बेटीचा व्यवहार सुद्धा करीत असतात. आपल्या कुलदेवतेचे दर्शन करण्याकरिता हे आदिवासी बांधव आगदी आतुरतेन कोयापुणेम पौर्णिमेची वाट पाहत असतात. आदिवासी यांचे आराध्य देवतांचे वास्तव्य नैसर्गिक स्थळात असल्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला नवीन उर्जा मिळत असते. या ठिकाणाचे नैसर्गिक सौदर्य पाहण्यासाठी तसेच येथील नैसर्गिक गुफा पाहण्यासाठी गेर आदिवासी बांधवही मोठ्या प्रमाणावर आपली उपस्थिती दर्शवतात. दरवर्षी येथे येणाऱ्या लोकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. इथला नैसर्गिक परिसर पाहून मन रमून जात असल्याची भावना भाविक व्यत्क करतात. स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी यात्रेदरम्यान होणारी अफाट गर्दी पाहता गेल्या काही वर्षात योग्य सोयी सुविधा केल्या असल्यामुळे भाविकांना यात्रेला येणे सोयीस्कर झालंय. यात्रेदरम्यान जय सेवा जय गोंडवानाचा गजर करीत आदिवासी बाधव कचारगड सर करतात. अगदी पहिल्या दिवसापासून तर शेवटचा दिवसापर्यंत हा परिसर भाविकांच्या गर्दीमुळे फुलून जातो. आदिवासी समाज हा विकासापासून आजही कोसो दूर आहे. मात्र, या कचारगड येथील यात्रेचे अवचित्य साधून इतर राज्यातील आदिवासी एकत्रित येऊन या पर्वाला दरवर्षी भेट देतात हे नक्की. देशभरात भरवली जाणारी एकमेव गांधीबाबांची यात्रा | उजेडगाव-लातूर | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Mcoca : वाल्मीक कराडवर मकोका! पुढे काय कारवाई होणार? CID ला कोणते पुरावे मिळाले?Suresh Dhas On Walmik Karad Mcoca : कायदा कोणालाही सोडणार नाही, सुरेश धस यांची प्रतिक्रियाWalmik Karad Mcoca : वाल्मिक कराडवर मकोका, कराडच्या वकिलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 14 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Suresh Dhas on Walmik Karad MCOCA : अखेर वाल्मिक कराडावर मकोका अंतर्गत गुन्हा, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अखेर वाल्मिक कराडावर मकोका अंतर्गत गुन्हा, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget