Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 09 ऑगस्ट 2022 : मंगळवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. 40 दिवस रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला आज सकाळी 11चा मुहूर्त, पूर्ण मंत्रिमंडळ विस्ताराऐवजी 16 ते 20 मंत्री शपथ घेण्याची शक्यता
2. भाजपकडून चंद्रकांत पाटील, महाजन, मुनगंटीवार, विखे... तर शिंदे गटाकडून उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, भुमरे यांचं मंत्रिपद निश्चित
3. पावसाळी अधिवेशनाची तारीख बदलली, 17 ते 23 ऑगस्ट दरम्यान पावसाळी अधिवेशन, कामकाज सल्लागार समितीची बैठकही पुढे ढकलली
सध्या राज्यात काही भागात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. मुंबईसह (Mumbai) परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. तसेच मराठवाडा आणि कोकण पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, 11 ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. पुढील दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
4. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून शिवसेनेकडून औरंगाबादच्या अंबादास दानवेंचं नाव जाहीर, मात्र काँग्रेसनं 3 ऑगस्टलाच सभापतींना पत्र लिहिल्याची बाब उजेडात
5. टीईटी घोटाळ्यानंतर आलेल्या यादीत अब्दुल सत्तारांच्या मुलांची नावं, चार मुलांचं प्रमाणपत्र रद्द, तर टीईटी घोटाळा प्रकरणात ईडीचा तपास सुरु
6. मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारकडून 6 हजार कोटी वितरीत, मोदी सरकारला शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं मोठं गिफ्ट
7. राज्यभर पावसाचा जोर कायम, मुंबईत अतिवृष्टीचा इशारा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर कोकणातही मुसळधार पावसाचा इशारा
8. मुंबईत स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या वाढली, गेल्या सात दिवसात स्वाईन फ्लूचे ८० रुग्ण तर मलेरिया, गॅस्ट्रोच्या रुणांमध्येही वाढ
गेल्या काली दिवसांपासून मुंबईत स्वाईन फ्लूच्या (Swine Flu) रुग्णांची संख्या वाढत आहे. 2021 च्या तुलनेत यंदा स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या तीन पटीने वाढली आहे. मागील सात दिवसांत स्वाईन फ्लूचे 80 रुग्ण आढळले आहेत. तर जुलैपासून आतापर्यंत 185 रुग्ण आहेत. जुलै महिन्यात 105 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, लेप्टो या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढते. परंतु, जून महिण्यापासून मुंबईत स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळत आहेत. 1 जून ते 7 ऑगस्टपर्यंत मुंबईत 189 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. 2021 च्या तुनेत ही संख्या तीन पटीने जास्त आहे. 2021 ला मुंबईत स्वाईन फ्लूचे 64 रूग्ण आढळले होते.
9. 25 वर्षांपूर्वी मराठी रंगभूमी गाजवणारं जयंत पवारांचं 'अधांतर' पुन्हा रंगमंचावर येणार, मुंबईतल्या गिरणी संपानं पिचलेल्या कुटुंबाची व्यथा नाटकात सादर
10. कॉमनवेल्थ स्पर्धेची सांगता, स्पर्धेअखेरी भारत गुणतालिकेत चौथ्या स्थानी; 22 सुवर्णपदकं, 16 रौप्यपदकांसह 23 कांस्यपदकांची कमाई