Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 17 एप्रिल 2022 : रविवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
Raj Thackeray Speech In Pune : राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.. काल हनुमान आरतीवरून आणि राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून जोरदार टीका होत आहे. आज राज ठाकरे त्याला काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे. आज दुपारी 12 वाजता त्यांची पुण्यात पत्रकार परिषद आहे. कालच संजय राऊतांनी राज ठाकरे यांना 'नवहिंदुत्ववादी ओवेसी' असं संबोधत त्यांच्यावर टीका केली होती. तसंच गहमंत्र्यांनीही राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला केराची टोपली दाखवत मशिंदींवरील भोंगे उतरवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे या सगळ्यावर काय प्रतिक्रिया देणार, पुढील भूमिका काय असेल या प्रश्नांचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे.
2.शौचालय घोटाळ्याच्या आरोपांनंतर किरीट सोमय्या यांचं प्रशासकीय अधिकारी, विविध खात्यांना पत्र; संजय राऊत यांचे आरोप फेटाळले
3.दिल्लीत हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत दगडफेक आणि जाळपोळ, हिंसाचारात ६ पोलिसांसह ७ जखमी, १० जणांना ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती
Delhi Violence : दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंती मिरवणुकीत झालेल्या गोंधळामुळे उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. धार्मिक स्थळं आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणी अधिक गस्त वाढवण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांतील पोलीस प्रशासनाला अधिक दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज अयोध्येत 84 कोशी यात्रा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस प्रशासनाला विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
4.देशातील वाढत्या हिंसाचारासह प्रक्षोभक भाषणांवर पंतप्रधान मोदी गप्प का? पवार, सोनिया, ममता यांच्यासह १३ प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांचा सवाल
5.निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
6.पैठण बाजार समितीत कांद्याला नीचांकी1 00 रुपयांचा दर, आवक वाढल्याने दर गडगडले, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल
7.रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीमधील कंपनीत अग्नितांडव, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
8. कोळशाचे उत्पादन वाढले असते तर आज कोळशाचा तुटवडा जाणवला नसता, मंत्री नितीन गडकरींचं मत
8. ब्रिटनचे PM जॉन्सन यांचा भारत दौरा, विविध उद्योगपतींना भेटणार, अनेक मुद्द्यांवर होणार चर्चा
10. कार्तिक-मॅक्सवेलची फटकेबाजी, हेजलवूडचा भेदक मारा, आरसीबीचा दिल्लीवर विजय; आज दोन महामुकाबले