Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 08 जून 2022 : बुधवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. बारावीच्या परीक्षेचा आज निकाल, विद्यार्थी पालकांची धाकधूक वाढली, दुपारी 1 नंतर एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा संपूर्ण निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच काल (मंगळवारी) स्वतः शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करुन माहिती दिली की, आज बारावी बोर्डाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज म्हणजेच, 8 जून 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. आज दुपारी एक वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. यंदा 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यावर्षी 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. पण, यावेळी बारावीची परीक्षाच 15 दिवस उशिरानं झाल्यामुळे निकालही आठवडाभर उशिरा लागणार आहे.
2. औरंगाबादमध्ये आज धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ, सभास्थळी ठेवलेल्या छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळ्याची चर्चा, कुणावर निशाणा साधणार याची उत्सुकता
3. राज्यसभेसाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानाला परवानगी देण्यास ईडीचा विरोध, न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी
4. विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून आज सचिन आहिर आणि आमश्या पाडवी उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर भाजपकडून उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात याची उत्सुकता कायम
5. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा प्रकरणी मुंबई खार पोलीस आरोपपत्र दाखल करणार, राणा दाम्पत्याला सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 07 जून 2022 : मंगळवार : एबीपी माझा
6. वेळेआधी पाऊस येण्याचा अंदाज वर्तवणारं हवामान विभाग पुन्हा तोंडघशी, मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला, महाराष्ट्रातल्या आगमनासाठी१२ जूनचा नवा मुहूर्त
7. अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गाचं 75 किलोमीटर्सचं काम अवघ्या 5 दिवसात पूर्ण, रस्त्याच्या वेगवान कामाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद
8. मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ, 24 तासांत एक हजार 242 रुग्ण, 72 जण रुग्णालयात
9. ठळक बातम्यांचा 'भारदस्त' आवाज हरपला, प्रख्यात वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन, दीर्घ आजारानं वयाच्या 64 वर्षी अखेरचा श्वास
10. मुंबईच्या सुवेद पारकरचं रणजी पदार्पणात द्विशतक, उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात पहिला डाव आठ बाद 647 धावांवर घोषित, सरफराझ खानचंही दमदार दीडशतक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
