Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 29 जुलै 2022 : शुक्रवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. अमित शाह यांच्याशी चर्चेनंतरच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार, यादीतून नाव कापल्याच्या चर्चेमुळे अब्दुल सत्तार दिल्लीत असल्याची माहिती तर गिरीश महाजनांची शाहांशी चर्चा
2. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर, दुपारी 4 वाजता नाशिकच्या दिशेने होणार रवाना, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दौऱ्यातून शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न
Eknath Shinde Maharashtra Tour : आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दौरा करणार आहेत. आज (29 जुलै) सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्री मुंबई येथील शासकीय निवासस्थानाहून नाशिक मार्गे मालेगावकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचं मालेगाव शासकीय विश्रामगृहावर आगमन होईल. रात्री येथेच त्यांच्या मुक्काम असेल. 30 जुलै रोजी सकाळी 10 वाजेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्यास सुरुवात करतील. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच 30 जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. 30 जुलै आणि 31 जुलै रोजी मुख्यमंत्री मालेगाव तसेच संभाजीनगरचा दौरा करतील. दरम्यान या दौऱ्याला राजकीय पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री नाशिक ऐवजी थेट मालेगाव तालुक्याचा नियोजित दौरा करणार असं समोर येत आहे. शिवसेनेचे दादा भुसे आणि सुहास कांदे हे निष्ठावंत शिवसैनिक शिंदे गटात सामील झाल्यानंतर नाशिकमध्ये शिवसेना दुबळी झाल्याचे चित्र आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी आधी संजय राऊत त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी दौरा केला. आदित्य ठाकरे यांनी तर तिन्ही बंडखोरांवर चांगलीच आगपाखड केली. त्यामुळे दादा भुसे आणि सुहास कांदे यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट मालेगावात येणार आहेत. दरम्यान या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे भूमिपूजन, उदघाटन आणि विशेष जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं आहे.
3. आरेमधील वृक्षतोडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीची शक्यता, कारशेडचं काम थांबवण्याची याचिकेतून मागणी, तर आरेची काळजी म्हणत पर्यावरणप्रेमींचा रात्रभर जागर
4.मुंबईसह, पुणे, सोलापूर आणि परभणीत पावसाची हजेरी, आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
5.मुंबई आणि परिसरात स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या वाढली; गेल्या आठवडाभरात स्वाईन फ्लूचे रुग्ण पाचपटीनं वाढले
6.मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर होणार, यंदा ओबीसी आरक्षणासकट प्रभाग आरक्षण सोडत
7.आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार, शिंदे सरकारकडून अध्यादेश जारी
8.. राजस्थानच्या बाडमेरजवळ मिग-21 कोसळलं, जोरदार स्फोटानंतर विमानाला आग, दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू
9.. बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची शानदार सुरुवात, भारतीय चमूच्या प्रवेशाने स्टेडियम दुमदुमलं, सिंधू आणि मनप्रीत बनले ध्वजवाहक
10.आजपासून भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान टी-20 मालिका, एकदिवसीय मालिका खिशात घातल्यानंतर टी-20 मालिकाही खिशात घालण्याचं टीम इंडियाचं लक्ष्य