Top 10 Maharashtra Marathi News : सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 25 सप्टेंबर 2022 : रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, वर्षा बंगल्यावर रात्री उशीरा झालेल्या बैठकीचं कारण गुलदस्त्यात
2. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा हट्ट सोडण्याचा सल्ला ऐकला नाही, राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या सल्ल्याची मनसे नेते प्रकाश महाजनांकडून आठवण तर शिंदेंनी याचिका केली नव्हती, सामंतांचं स्पष्टीकरण
3. मध्य रेल्वे आणि हार्बर लाईनवर मेगाब्लॉक, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा
मध्य रेल्वेवर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत माटुंगा-ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर परिणाम होईल. सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान वळवल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत परिणाम दिसेल.
4. पुण्यातल्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेविरोधात सर्वपक्षीयांची आगपाखड, युवासेना आणि मनसेकडून आंदोलनाची हाक, पाकिस्तानचा ध्वज जाळून करणार निषेध
5. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातल्या 6 जिल्ह्यांचे पालकमंत्री, भाजपकडे 21 जिल्ह्यांचं पालकत्व तर शिंदे गटाच्या मंत्र्यांकडे 15 जिल्हे
6. 'कुणी आरे केलं तर कारे करा, एक मारली तर चार मारा'; कृषिमंत्री सत्तारांचा अजब सल्ला
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar News) आपल्या परभणीतील (Parbhani News Updates) भाषणामुळं चर्चेत आले आहेत. कुणी आरे करत असेल तर त्याला कारे करा एक मारली तर त्याला चार मारा अशा शब्दात त्यांनी परभणीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना अजब सल्ला दिला आहे. अब्दुल सत्तारांनी या भाषणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही चांगलीच टीका केली आहे.
7. राजस्थानमध्ये अशोक गहलोत यांच्या उत्तराधिकाऱ्याचा आज फैसला होण्याची शक्यता, जयपूरमध्ये आज काँग्रेस विधिमंडळ दलाची बैठक, खर्गे आणि अजय माकन उपस्थित राहणार
8. भारतात आशियातील सर्वात मोठा डिफेन्स एक्स्पो, गुजरातमध्ये ऑक्टोबर महिन्यात भरणार प्रदर्शन
भारतात आशियातील सर्वात मोठा डिफेन्स एक्स्पो (Defence Expo 2022) होणार आहे. पुढील महिन्यात गुजरातमध्ये प्रदर्शन भरलं आहे. गुजरातमध्ये 18 ते 22 ऑक्टोबर दरम्यान गुजरातची राजधानी गांधीनगर येथे डिफेन्स एक्सो पार पडणार आहे. आशियातील सर्वात मोठ्या डिफेन्स एक्स्पोमध्ये यावेळी अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतील. यंदा डिफोन्स एक्स्पोमध्ये केवळ स्वदेशी अर्थात भारतीय कंपन्या सहभागी होणार आहेत.
9. कॅप्टन कूल आज मोठी घोषणा करण्याची शक्यता, दुपारी दोन वाजता महेंद्रसिंह धोनीच्या फेसबुक लाईव्हकडे चाहत्यांचं लक्ष
10. भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया मैदानावर उतरणार, हैदराबादमधला सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ सज्ज