Top 10 Maharashtra Marathi News : सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 21 सप्टेंबर 2022 : बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. शिवसेनेतील सर्वात मोठ्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज पहिला जाहीर मेळावा, मुंबईत गोरेगावच्या नेस्को मैदानावर गटप्रमुखांना मार्गदर्शन करणार
Shivsena Uddhav Thackeray : काही महिन्यांवर आलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या आणि शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील शिवसेना गटप्रमुखांचा आज मेळावा पार पडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना (Shivsena) मुंबई महापालिका निवडणुकीचे (BMC Election) शिवसेना रणशिंग फुंकणार आहे. दसरा मेळाव्याआधी होणाऱ्या मेळाव्याला विशेष महत्त्व आले आहे. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात आज संध्याकाळी 7 वाजता हा मेळावा होणार आहे.
मुंबई महापालिकेवर मागील 30 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. त्यापैकी 25 वर्ष शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. मागील महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्य लढत झाली होती. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये फार कमी अंतर राहिले होते. त्यामुळे शिवसेनेला सत्तेतून बाहेर करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडाने शिवसेना काही प्रमाणात कमकुवत झाल्याचे चित्र आहे.
2. दसऱ्या मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कोणत्याच गटाला मिळणार नाही, पालिकेच्या विधी-न्याय विभागाचा अभिप्राय माझाच्या हाती तर दसरा मेळाव्यात तेजस ठाकरेंच्या एंट्रीची चर्चा
3. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकारी मंत्र्यांसह दिल्ली दौऱ्यावर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार, राज्यातील लॉजिस्टिक पार्कसह विविध विकासकामांबाबत गाठीभेटी
4. अडीच महिन्यातच शिंदे गटावर भाजप नाराज, विरोधकांचा दावा, शिंदेंच्या निर्णय घेण्याच्या स्टाईलवरुन भाजपतच खदखद असल्याच्याही चर्चा
5. पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांच्या सहभागाची चौकशी करा, अतुल भातखळकरांची मागणी तर एका माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत म्हाडा अधिकाऱ्यांची बैठक, ईडीच्या आरोपपत्रात गौप्यस्फोट
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 21 सप्टेंबर 2022 : बुधवार
6. काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नावाचीही चर्चा, आज सकाळी सोनिया गांधींची भेट घेणार, राहुल गांधींनी अर्ज दाखल न केल्यास थरुर वि. गहलोत सामना
7. महिला हॉस्टेलमधील बाथरुममध्ये डोकावणाऱ्या विकृताला अटक, आयआयटी मुंबई परिसरातला धक्कादायक प्रकार
8. लालबागचा राजा मंडळाला पालिकेकडून 3 लाखांचा दंड, रस्त्यांवर खड्डे पाडल्यानं पालिकेची कारवाई, रस्त्यावर 150 आणि फुटपाथवर 53 खड्डे पाडल्याचा आरोप
9. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कीर्तनाला नाही तर फक्त स्पीकरवर बंदी, मंदिर प्रशासनाचं स्पष्टीकरण, काही माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या आल्याचा दावा
10. रुपी बँकेला कोर्ट आणि केंद्राकडून दिलासा नाहीच, राज्यातील रुपी बँकेला उद्यापासून कायमचं टाळं लागणार, खातेधारकांना खात्यातील रक्कम काढता येणार नाही