Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 11 एप्रिल 2022 : सोमवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
Top 10 Maharashtra Marathi News :
ऊर्जामंत्र्यांच्या ग्वाहीनंतरही ऐन उन्हाळ्यात लोडशेडिंग वाढण्याची शक्यता, कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यात 3 हजार 500 मेगावॅट विजेची तूट
मुंबईत मानखुर्दमध्ये जमावाकडून तोडफोड, 15 ते 20 गाड्यांचं नुकसान केल्याची माहिती, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात
कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा, फडणवीसांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री ठाकरेंचं प्रत्युत्तर
शरद पवार मुख्यमंत्री झाले असते, तर महाराष्ट्राचं चित्रं वेगळं असतं, मंत्री यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यानं आघाडीत खदखद
Yashomati Thakur Neelam Gorhe Twitter War : महाविकास आघाडीतील नेते (Maha Vikas Aghadi)अनेकदा एकमेकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निशाणा साधत असल्याचं समोर येत असतं. आता अशीच टोलेबाजी शिवसेना (shiv sena) आणि काँग्रेस (Congress) नेत्यांमध्ये सुरु असल्याचं दिसतंय. राज्याच्या मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन हा नवा वाद सुरु झालाय. ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर विधानसभेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी टोला लगावला आहे. या वादाची ट्विटरवर चर्चा रंगली आहे. या वादाच्या केंद्रस्थानी आहेत महाविकास आघाडीचे जनक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार. त्याचं झालं असं की काल शरद पवार हे अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 57 वी पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली कार्यक्रमात बोलताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांचं कौतुक करत म्हटलं की, पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं. पवार साहेब ही काळाची गरज आहे. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र अस्थिर होणार नाही, असं ठाकूर यांनी म्हटलं.
यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यानंतर अर्थातच शिवसेनेकडून प्रतिक्रिया येणं अपेक्षितच होतं. यावर प्रत्युत्तर देताना शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं की, यशोमती ठाकून यांनी अमरावतीत विधान केले आहे की शरद पवार मुख्यमंत्री असते तर वेगळे चित्र दिसले असते. यशोमतीताई, मला तर असे वाटते की पवार साहेबांना UPAचे अध्यक्ष करावे! त्यामुळे तर पूर्ण भारताला ऊपयोग होईल! देता प्रस्ताव? असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. या दोन्ही नेत्यांच्या ट्विट्सची चर्चा जोरात आहे. यावर कार्यकर्ते देखील आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
आयएनएस विक्रांत निधीप्रकरणी किरीट सोमय्या यांच्या याचिकेवर आज सत्र न्यायालयात सुनावणी, अटकपूर्व जामीन मिळणार का याकडं लक्ष
शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज संपणार, पोलिसांकडून काल सदावर्तेंच्या निवासस्थानी तपास
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलच्या जाहीर नाराजीनंतर बक्षीसांचा वर्षाव, राजकीय नेते आणि संस्थांकडून रोख बक्षीस देण्याची घोषणा
दिल्लीचं जेएनयू पुन्हा एकदा वादात, नवरात्रीमध्ये नॉन-व्हेज खाण्यावरुन अभाविप आणि डाव्या संघटनांचे विद्यार्थी भिडले, सहा जण जखमी
शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून सूत्रं हाती घेणार,शपथविधीआधी शरीफ यांनी आळवला काश्मीर राग
राजस्थानची भेदक गोलंदाजी, रोमांचक सामन्यात लखनौचा 3 धावांनी पराभव, आज हैदराबाद-गुजरात भिडणार