![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 10 Maharashtra Marathi News : सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 10 ऑक्टोबर 2022 : सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
![Top 10 Maharashtra Marathi News : सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 10 ऑक्टोबर 2022 : सोमवार Top 10 Maharashtra Marathi News maharashtra news smart bulletin 10 october 2022 Monday Top 10 Maharashtra Marathi News : सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 10 ऑक्टोबर 2022 : सोमवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/2ef7ada4d87022a10cfbea5d3bfc85a0166538106539388_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
1. पक्षचिन्हासाठी ठाकरे गटाचं त्रिशूळाला प्राधान्य, मशाल आणि उगवता सूर्याचाही पर्याय, नावाचा विकल्प देताना शिवसेना-ठाकरे समीकरण कायम ठेवण्याचा प्रयत्न
ठाकरेंच्या शिवसेनेचं नवं नाव काय आणि या पक्षाचं निवडणूक चिन्हं कोणतं? याचा फैसला आज निवडणूक आयोग करणार आहे. ठाकरे गटाकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी तीन आयोगाला सूचवण्यात आली आहेत. तर त्रिशूळ, मशाल आणि उगवता सूर्य अशी तीन निवडणूक चिन्हांचे पर्याय देण्यात आलेत. निवडणूक आयोग यातल्या कोणत्या पर्यायांवर शिक्कामोर्तब करणार याची उत्सुकता आहे. 56 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या, आणि नंतर राज्याच्या राजकारणात अविभाज्य भाग बनलेल्या शिवसेनेत सर्वात मोठ्या बंडानंतर प्रथमच नाव आणि चिन्हासाठी संघर्ष करण्याची वेळ आलीय. त्यामुळे या संघर्षात ठाकरेंच्या शिवसेनेला कोणतं नाव आणि चिन्ह मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.
2. पक्ष चिन्ह म्हणून शिंदे गटाकडून तुतारी, गदा आणि तलवार या पर्यायांचा विचार, नावामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि दिघेंना स्थान देण्याचा प्रयत्न, अद्याप अधिकृत घोषणा नाही
धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव गोठवल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाला आज दुपारी 1 वाजेपर्यंत चिन्ह आणि नावांचे पर्याय द्यावे लागणार आहेत. शिंदे गटाकडून तुतारी, गदा आणि तलवार या चिन्हाचे पर्याय दिलं जाणार असल्याचं बोललं जातंय. त्यातच शिंदे गटाकडून तुतारी या चिन्हाला प्राधान्य असल्याची चर्चा आहे.. तसंच पक्षाच्या नावात शिंदे गट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा उल्लेख ठेवणार असल्याची माहिती मिळतेय. शिंदे गटाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहितील दिलेली नाही. वर्षा बंगल्यावर काल रात्री झालेल्या बैठकीत या सर्व विषयांवर चर्चा झाल्याचं समजतंय. आज दुपारी 1 वाजेपर्यंत शिंदे गट आयोगाकडे कोणती चिन्हं आणि नावांचा पर्याय देणार याकडं लक्ष लागलंय.
3. उद्धव ठाकरेंकडून शिंदे गटाला रावणाची उपमा, शिंदे गटाचाही पलटवार, तर धनुष्यबाण गोठवल्यानं उद्धव भावूक झाल्याची जाधवांची माहिती
4. आनंद दिघे असते तर शिंदेंना उलटं टांगलं असतं, चंद्रकांत खैरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, शिंदे गटाकडून खैरेंविरोधात गुन्हा दाखल
5. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देऊ नका, राज ठाकरेंची कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सूचना तर मनसेच्या ट्विटरवर राज ठाकरेंचा व्हीडिओ शेअर करत उद्धव ठाकरेंना सूचक सल्ला
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 10 ऑक्टोबर 2022 : सोमवार
6. वर्षा बंगल्यावरील बैठकीत सत्तारांनी मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवाला शिवीगाळ केल्याची चर्चा, सत्तारांना शांत करण्यासाठी इतर मंत्र्यांची मध्यस्थी
7. संजय राऊतांच्या जामिनावर आज सत्र न्यायालयात सुनावणी; पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत कोठडीत
8. मुंबईत डोळ्याची साथ, संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन
9. श्रेयस अय्यरच्या शतकामुळे भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दुसऱ्या वनडेत सात गडी राखून विजय, मालिकेत बरोबरी
10. एक वर्ष काम केल्यास कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटीचा अधिकार, 15 मिनिटंही जास्त काम केल्यास ओव्हरटाईम मिळणार, कामगार कायद्यातील नव्या तरतुदी लवकरच लागू होणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)