Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 08 जुलै 2022 : शुक्रवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर, मोदी, शाह आणि नड्डांची भेट घेणार
2. बंडखोरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंची आजपासून निष्ठा यात्रा, पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं आव्हान, तर संजय राऊत पक्षबांधणीसाठी नाशकात
3.शिंदे सरकारने स्वतःची प्रतिमा स्थगिती सरकार अशी होऊ देऊ नये, अशोक चव्हाणांचा निशाणा
4.शिवसेनेला आणखी एक झटक्याची शक्यता, आमदारानंतर खासदारही बंडखोरीच्या वाटेवर?
5. पश्चिम महाराष्ट्रातल्या पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचा निर्णय, ठाकरेंनी ब्रेक दिलेल्या अनेक प्रकल्प पुन्हा ट्रॅकवर, अॅग्री बिझनेस योजनेलाही हिरवा कंदील
6. मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार, ऑरेंज अलर्ट मिळालेल्या भागात सकाळी 10 नंतर समुद्र किनाऱ्यांवर नो एन्ट्री तर राज्यात 10 दिवसांत तब्बल 66 जणांचा मृत्यू
Maharashtra Rain Update : राज्यात पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात आज रेड अलर्ट आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातलाय. आता याचं पावसानं मध्य महाराष्ट्र, विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाडही आपल्या कवेत घेतलाय. राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये कालपासून तीन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुसळधार ते अती मुसळधार पाऊस बरसणार असल्यानं प्रशासन सतर्क झालं आहे. नदीकाठच्या नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
7.संतांच्या पालख्यांचा पंढरपूरमध्ये प्रवेश, तुकाराम आणि माऊलींच्या पालखीचं बाजीराव विहिरीजवळ गोल रिंगण, दोन्ही पालख्या आज वाखरीला मुक्कामी
8.साखर निर्यातीबाबत कारखानदारांना दिलासा, 8 लाख मे टन निर्यातीला मुदतवाढ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9. पहिल्या टी-20 सामन्यात भारताकडून इंग्लंडचा 50 धावांनी धुव्वा, अष्टपैलू हार्दिक पंड्या विजयाचा शिल्पकार, मालिकेत1-0 ची आघाडी
10 . ब्रिटनमध्ये 40 जणांच्या बंडखोरीमुळं बोरिस जॉन्सन यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा, भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदाच्या शर्यतीत