Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 02 सप्टेंबर 2022 : शुक्रवार : एबीपी माझा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ, रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कोसळधार
2. मुंबईतील नागपाडामधील महिलेला मारहाण प्रकरणी मनसेच्या तिघांना अटक, गणपतीचा मंडप उभारण्याच्या वादातून मारहाण, मनसे पदाधिकारी विनोद अरगिलेससह अन्य दोघांना बेड्या
Mumbai Police Latest Update: मुंबईतील नागपाडा परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तिन्ही मनसे कार्यकर्त्यांना अटक केली आहे. नागपाडा पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजमनातून संताप व्यक्त केला जात होता. पोलिसांनी सांगितले की, आरोपी गणेश भक्तांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यासाठी पीडित महिलेच्या दुकानासमोर बांबू लावत होता. त्याला पीडित महिलेने विरोध केला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पीडित महिलेशी धक्काबुक्की केली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत: महिलेशी संपर्क साधला आणि पोलिस ठाण्यात तिचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला. आरोपी विनोद अरगिळे, राजू अरगिळे, संदीप लाड यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. मुंबईतील मुंबादेवी परिसरात एका ठिकाणी गणपतीचा मंडप उभारला जात होता. त्याच ठिकाणी बॅनर लावण्यासाठी आजूबाजूच्या दुकानांच्या समोर बांबू लावले जात होते. तेथील एका मेडिकल शॉपसमोर काही मनसे पदाधिकारी बांबू लावत होते. त्यावेळी व्हिडीओमध्ये दिसत असलेली महिला. महिलेने त्यांना ते बांबू लावण्यास विरोध केला. त्यावेळी मनसे उपविभाग प्रमुख विनोद अरगिळे याच्याकडून महिलेला मारहाण करण्यात आली.
3. मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात 50 मिनिटं चर्चा, सत्तातरानंतर भाजप नेत्यांच्या भेटीगाठीनंतर शिंदेंच्या भेटीमुळे तर्कवितर्क, अमित शाहांच्या दौऱ्याकडे लक्ष
4. राज्याला लवकरच 23 आणखी मंत्री मिळतील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती, दसऱ्यापर्यंत आणखी 23 जणांचा शपथविधी होणार असल्याची चर्चा
5. पुणे महापालिकेचे दोन पालिकांमध्ये विभाजन झालं पाहिजे, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटलांचं विधान, पुणे पालिकेचं क्षेत्र इतर पालिकांपेक्षा मोठं असल्याचं मत
6अकोला राष्ट्रवादीतील वादाचा तिसरा अंक; मिटकरींचे एका महिलेच्या प्रकरणाचे व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा जिल्हाध्यक्षांचा दावा
7. मुरुघा मठाचे प्रमुख शिवमूर्ती मुरुघा यांना अखेर अटक, म्हैसूर पोलिसांची कारवाई, अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप
8. जगाला घडणार मेक इन इंडियाचं दर्शन, आयएनएस विक्रांत आज नौदलात दाखल होणार, कोच्चीमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सोहळा
9. आशिया चषकातून बांगलादेशचं पॅकअप, श्रीलंकेचा सुपर-4 मध्ये प्रवेश, आज पाकिस्तानचा हॉंगकॉंगशी सामना
10. विराट कोहली-अनुष्का शर्मा झाले अलिबागकर, 8 एकर जमीन 19 कोटी रुपयांत विकत घेतली