(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2022 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2022 | शनिवार*
*1.* मुंबईत मध्य, हार्बर रेल्वेवर आज रात्री 11 वाजेपासून 27 तासांचा महाब्लॉक, कर्नाक, कोपरी पुलाच्या कामासाठी वाहतुकीला ब्रेक; लोकल, एक्स्प्रेस गाड्या रद्द https://bit.ly/3OjLSiK रेल्वेने मुंबईला जायचा विचार करताय? मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या गाड्या सोमवारपर्यंत रद्द https://bit.ly/3Ozwz61
*2.* बळीराजाची क्रूर थट्टा! कुणाला पावणेदोन रुपये तर कुणाला 70 रुपयांची मदत; परभणीत शेतकरी आक्रमक https://bit.ly/3OnNU1G
*3.* शिवाजी महाराज जुन्या काळातील हिरो, नव्या काळातील आदर्श आंबेडकरांपासून गडकरींपर्यंत, औरंगाबादच्या कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य https://bit.ly/3OkjZqU 'कोश्यारी नावाचं पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवा'; मनसेसह शिवसेना, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेडकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार https://bit.ly/3OiiR7f
*4.* 'श्रद्धाच्या हत्येत आफताबच्या कुटुंबीयांचाही सहभाग', श्रद्धाच्या वडिलांचा गंभीर आरोप, एबीपी माझावर मन केलं मोकळं https://bit.ly/3EecxsQ दोन वर्षांपूर्वी आफताबविरोधात श्रद्धाने केली होती नालासोपारामध्ये पोलीस तक्रार, पण... https://bit.ly/3EmpdOj श्रद्धा वालकर प्रकरणावर चित्रपट, नावही ठरलं; हा दिग्दर्शक करणार निर्मिती https://bit.ly/3VskqlB
*5.* लव्ह जिहादमुळे राज्यातील अनेक तरुणी बेपत्ता, महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य, बेपत्ता तरुणींना शोधण्यासाठी विशेष पथक नेमणार https://bit.ly/3Omw9zr
*6.* स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट, मनसेने सावरकरांबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत मानले आभार https://bit.ly/3hLv8oq सावरकरांच्या मुद्यावर शिवसेनेने राहुल गांधींचे कान टोचले , भाजपवरही निशाणा https://bit.ly/3XfKvG4 'ए मुर्खा... हिंमत असेल तर इथे ये', शरद पोंक्षेंचा नाव न घेता राहुल गांधींवर हल्लाबोल; शेअर केला व्हिडीओ https://bit.ly/3XejHpz
*7.* राज्यात गुलाबी थंडीची एन्ट्री, वेण्णा लेक परिसरात पारा 6 अंशांवर, तर नाशिकमध्ये मोसमातील निचांकी तापमानाची नोंद https://bit.ly/3GwjZCm
*8.* राहुल गांधींच्या हस्ते संविधानाच्या एक लाख प्रती वाटपाला सुरुवात, कुठे पोहोचली भारत जोडो यात्रा? https://bit.ly/3hWOYNN भारत जोडो यात्रेनंतर महाराष्ट्रातील सहाही विभागात काँग्रेस किसान रॅली काढणार https://bit.ly/3TPifXO
*9.* मनिका बत्रानं इतिहास रचला; आशियाई कप टेबल टेनिस स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू https://bit.ly/3TQQqOP
*10.* विश्वचषकातील पराभव जिव्हारी, चेतन शर्माच्या नेतृत्वातील निवड समिती बरखास्त, नव्याने अर्ज मागवले https://bit.ly/3USnkzU समिती बरखास्तीची 5 मोठी कारणं समोर https://bit.ly/3tO20Q4
*माझा कट्टा* :- अमेरिकेतील संसदेतील मराठी आवाज, खासदार श्री ठाणेदार यांच्याशी गप्पा, आज रात्री 9 वाजता
*माझा ब्लॉग* :- सेमी फायनलमध्ये आऊट, निवड समितीला गो आऊट; बीसीसीआयचं कडक पाऊल!; एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/3EK34L7
*ABP माझा स्पेशल*
International Mens Day 2022 : आज साजरा केला जातोय 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन'; काय आहे या दिनाचं महत्त्व? वाचा सविस्तर माहिती https://bit.ly/3TTNYai
Indira Gandhi Birth Anniversary: एक संधी मिळाली अन् इंदिरा गांधींनी 14 दिवसात पाकिस्तानचे दोन तुकडे केले; नेमकं काय घडलं? https://bit.ly/3VeNTzf
'भाकरी' महाग झाली! अवकाळीच्या फटक्यामुळं ज्वारी, बाजरीचे दर 5 हजारांवर, गहूही महागले https://bit.ly/3Vdz7Zg
IRCTC : रेल्वेत मिळणार आता प्रवाशांच्या आवडीचे तसेच स्थानिक खाद्यपदार्थ , रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा https://bit.ly/3ENj92Z
संपूर्ण गावच गेलं सुट्टीवर, 600 वर्षांची आगळीवेगळी परंपरा; सिंधुदुर्गातील चिंदर ग्रामस्थ गुराढोरांसह वेशीबाहेर https://bit.ly/3UMvzNY
*यू ट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv