एक्स्प्लोर

टूल किट प्रकरण : संशयित शंतनू मुळूकच्या बीडमधील घरी दिल्ली पोलिसाची रेड

Toolkit Case: बीड शहरातील शंतनु शिवलाल मुळूक या तरुणावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांची टीम बीडमध्ये दाखल झाली आहे. दिल्ली पोलिसनी शंतनूच्या घराची झाडाझडती घेतली असून शंतनूच्या आई वडिलांची चौकशी केली.

बीड : शेतकरी आंदोलनादरम्यान टूल किटचे प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये बीड शहरातील शंतनु शिवलाल मुळूक या तरुणावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांची टीम बीडमध्ये दाखल झाली आहे. दिल्ली पोलिसनी शंतनूच्या घराची झाडाझडती घेतली असून शंतनूच्या आई वडिलांची चौकशी केली. तसेच बँकेत जाऊन खात्याचा देखील तपशील घेतला आहे. शंतनूची नाहक बदनामी केली जात असून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणूनच हा गुन्हा दाखल केला जात असल्याचा त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

Toolkit Case: दिशा रवीच्या अटकेनंतर चर्चेत आलेले टूलकिट काय आहे? ते कशा प्रकारे काम करतं?

बीड शहरातील चाणक्यपुरी भागात राहणाऱ्या शिवलाल मुळूक यांचा मोठा मुलगा आहे. शंतनू संदर्भात त्याच्या कुटुंबियांना विचारले असता त्यांनी सांगितलं शंतनू हा बी ई मॅकेनिक आहे. तसेच अमेरिकेत MS ची पदवी घेतली असून तो पर्यावरण संवर्धनासंदर्भात राष्ट्रीय पातळीवर काम करतो. शेतकऱ्यांसंदर्भात त्याला तळमळ असून शेतकरी आंदोलनाला सोशल मीडियाच्या माध्यमातून तो पाठींबा देत होता. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला मी शेतकऱ्यांची मुलगी म्ह्णून माझा देखील पाठींबा आहे. मात्र त्यामुळं आमची चौकशी केली जातेय. शंतनूचे आणि आमचे 8 दिवसापूर्वी बोलणं झालं होतं.पुन्हा बोलणं झालं नाही म्हणून चिंता वाटतेय अशी प्रतिक्रिया शंतनूच्या आईने दिली.

Toolkit Case | शेतकरी आंदोलनादरम्यान टूल किटप्रकरणी बीडच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

तर शंतनू हा इथेच राहतो. औरंगाबादमध्ये जॉब करत होता पुण्यात नव्याने काही सुरू करावे म्हणून गेला होता. आठ दिवसांपूर्वी त्याच माझं बोलणं झालं त्यानंतर काहीच बोलणं नाही झालं. दोन दिवसांपासून दिल्ली पोलीसांचे दोन अधिकारी आमची चौकशी करत आहेत. त्यांना आम्ही सहकार्य करत आहोत. शंतनू पर्यावरणा संदर्भात काम करतो. शेतकरी आंदोलना संदर्भात माहिती विचारात होता. आत्ता कुठे माहिती नाही अशी माहिती शंतनूचे वडील शिवलाल मुळूक यांनी दिली.

शंतनू मुळकच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट

ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी बेंगळुरू येथून दिशा रवी हिला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून गुन्ह्यातील शंतनू शिवलाल मुळक बीड याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. टूलकिट गुगल डॉकसाठी वापरण्यात आलेला ई मेल आयडी शंतनूचा असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत, अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळवण्यासाठी शंतनू मुळक याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड. सतेज जाधव अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला आहे. या अर्जावर आज सुनावणी अपेक्षित आहे. दरम्यान,अटक करण्यात आलेल्या दिशावर शेतकर्‍यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करणे आणि आणखी मुद्दे समाविष्ट करून पुढे पाठवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग हिने एक ट्विट करत शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शवला होता. या ट्विटसह ग्रेटा थनबर्गने एक टूल किट ट्विट केले होते. सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील असलेल्या निकिता जेकब यांच्या विरोधातदेखील अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले असून, पोलिसांच्या कारवाईपासून बचावासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget