एक्स्प्लोर
सुनील तटकरेंच्या घरात फूट, पुतण्याचा शिवसेनेत प्रवेश
![सुनील तटकरेंच्या घरात फूट, पुतण्याचा शिवसेनेत प्रवेश Tomorrow Sandeep Tatkare Will Enter In Shivsena सुनील तटकरेंच्या घरात फूट, पुतण्याचा शिवसेनेत प्रवेश](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/05124958/sunil-sandeep-tatkare.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
रोहा (रायगड) : काका-पुतण्या वाद महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. या वादाशी आता आणखी एक नाव जोडलं गेलंय, ते म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं. तटकरेंचा पुतण्या संदीप तटकरे हे उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.
रायगडमधील रोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी संदीप तटकरे यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
संदीप तटकरे कोण आहेत?
संदीप तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे बंधू आमदार अनिल तटकरे यांचे सुपुत्र आहेत. शिवाय, आमदार अवधूत तटकरे यांचे संदीप हे बंधू आहेत.
संदीप तटकरे यांचा शिवसेना प्रवेश सुनील तटकरे यांना मोठा धक्का मानला जातो आहे. तटकरे घराण्यातच मोठी फूट पडल्याचं चित्र आहे. शिवाय, रोहा नगरपालिकेत आता काका विरुद्ध पुतण्या असाच सामना रंगणार आहे.
आतापर्यंत रोहामधील राजकारण तटकरे विरुद्ध सर्व विरोधक असेच राहिले आहे. मात्र, थेट तटकरे कुटुंबच फुटल्याने आता तटकरे विरुद्ध तटकरे असं राजकारणाला नवं रुप मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)