एक्स्प्लोर

Todays Headline 30th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.

राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसंबंधी अनिश्चितता कायम 
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीसंदर्भात अनिश्चितता कायम आहे. या प्रश्नी आज सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या कामकाजाच्या विषयांमध्ये याचा समावेश नाही. त्यामुळे आज या प्रश्नी सुनावणी होणार की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. गुरूवारपर्यंत तातडीच्या सुनावणीसाठी कोणतंही प्रकरण थेट खंडपीठाकडे सादर करू नका असा आदेश नवनिर्वाचित सरन्यायाधीश उदय लळित यांनी दिला आहे. तातडीच्या प्रकरणांची माहिती रजिस्ट्रारकडे द्यावी, ते देतील त्या तारखेला सुनावणी होईल असे निर्देशही सरन्यायाधीश उदय लळीत यांनी दिले आहेत. त्यामुळे हा विषय ऐनवेळी न्यायालयाच्या कामकाजाच्या पटलावर येण्याची शक्यता कमी असल्याचं चित्र आहे. 

मेट्रो 3 ची उद्या ट्रायल
वादग्रस्त ठरलेल्या कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो 3 ची आज ट्रायल होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो 3 ची ट्रायल होणार आहे. आरेच्या सारीपूतनगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी होणार आहे. एकीकडे आरे कारशेडला पर्यावरणवाद्यांचा विरोध होत असताना दुसरीकडे मात्र ट्रायल सुरु करण्यात आली आहे. या मेट्रोसाठी दोन रॅक मुंबईत दाखल झाले आहेत. सकाळी 11 वाजता ही आरेच्या सारीपूतनगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी होणार आहे. सीप्झ ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरु करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे.

सर्वोच्च न्यायालयात आज मेट्रो कारशेडची संदर्भात महत्वाची सुनावणी
सर्वोच्च न्यायालयात आज मेट्रो कारशेडची संदर्भात महत्वाची सुनावणी होणार असून राज्य सरकारला आज कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. 24 ऑगस्टच्या सुनावणीत राज्य सरकारनं आणखी कागदपत्रं जमा करण्यासाठी वेळ मागितला होता. तेव्हा न्यायालयाने अशात आणखी किती दिवस आम्ही सुनावणी पुढे ढकलायची?, असा प्रश्न उपस्थित केला होता. आज पूर्वीच्या सातही याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय राज्य सरकारनं सुरु केलेल्या ट्रायल रनला हिरवा कंदील कायम ठेवतं की लालफितीत अडकवतं हे बघणं महत्त्वाचे असेल. 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget