Todays Headline 25th September : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
Todays Headline 25th September : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
पंतप्रधान मोदींची मन की बात -
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमामार्फत सकाळी 11 वाजता देशभरातील जनतेशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान मन की बात या कार्यक्रमाद्वारे संवाद साधतात. 25 तारखेला होणरा मन की बात या कार्यक्रमाचा 93 वा भाग आहे.
विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता -
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यत आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तानाजी सावंत यांचा लातूर दौरा -
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार, दिनांक 25 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता उस्मानाबाद ( धाराशिव) येथून लातूरकडे प्रयाण. सकाळी 11-00 वाजता लातूर येथे आगमन . सकाळी 11-30 वाजता लातूर येथील पक्षिय कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1-00 वाजता पुणेकडे प्रयाण करतील.
देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर -
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर च्या तरुण उद्योजक पुरस्कार वितरण सोहळ्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. संध्याकाळी चार वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
आरे कारशेडविरोधात आंदोलन -
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि आपनंतर आता कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांच्याकडून देखील आरे आरशेडच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मागील तीन महिन्यांपासून दर रविवारी कारशेडविरोधात आंदोलन केलं जातंय. अशात सीपीआय देखील ह्या आंदोलनात उतरणार आहे.
मनसेचं आंदोलन -
पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या आंदोलनात कथित स्वरुपात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याच्या निषेधार्थ मनसेचे उद्या पुण्यात आंदोलन होणार आहे. पुण्यातील अलका चौकात मनसे आंदोलन करणार आहे.
केसरकरांची पत्रकार परिषद -
राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर आज सांगली दौऱ्यावर आहेत. शिवसेना संपर्क यात्रेसंदर्भात बैठक होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता केसरकर यांची पत्रकार परिषद होणार आहे.
गुलाम नबी आजाद आपल्या पक्षाची घोषणा करणार?
काँग्रेसचे माजी नेता गुलाम नबी आजाद आज जम्मूमध्ये पोहचणार आहेत. सोमवारपर्यंत ते जम्मू काश्मीरमध्ये असतील त्यानंतर ते श्रीनगरला जाणार आहेत. आज गुलाम नबी आजाद नव्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
केजरीवाल गुजरात दौऱ्यावर -
आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गुजरात दौऱ्यावर आहेत. ते आज तीन टाउनहॉल मीटिंग्सला संबोधित करणार आहेत. गुजरातमध्ये पुढील काही दिवसांत निवडणुका होत आहेत, त्यापार्श्वभूमीवर केजरीवाल अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
फतेहाबादमध्ये रॅलीचं आयोजन -
माजी उप पंतप्रधान देवीलाल यांच्या जयंतीनिमित्तर फतेहाबादमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीवा अनेक विरोधीनेते येण्याची शक्यता आहे. इंडियन नेशनल लोकदल (इनेलो) यांनी रॅलीचं आयोजन केलेय. या रॅलीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, शरद पवार, प्रकाश सिंह बादल यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कांग्रेस, सीपीआई, आम आदमी पार्टी, बसपा या पक्षातील नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
लालू प्रसाद यादव आणि नीतीश कुमार सोनिया गांधींची भेट घेणार -
लालूप्रसाद यादव आणि नीतीश कुमार आज सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. 10 - जनपथवर सायंकाळी सहा वाजता चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष नेत्यांना एकत्र आणण्यासाठी सोनिया गांधी यांची भेट गेणार असल्याचं लालूप्रसाद यादव यांनी सांगितलं.
नितीन गडकरी जयपूर दौऱ्यावर -
केंद्रीय मंत्री नितीन आज जयपूर दौऱ्यावर आहेत. रविवारी ते धानक्या येथे सायंकाळी चार वाजता 106 व्या जंयतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
‘आरोग्य मंथन’चं उद्घाटन -
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला (एबी-पीएमजेएवाई) चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशनला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ‘आरोग्य मंथन’ या कार्यक्रमाचं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया उद्घाटन करणार आहेत. हा दोन दिवसांचा कार्यकर्म आहे.
दिवंगत राजू श्रीवास्तव यांची श्रद्धांजली सभा -
मुंबईतील इस्कॉन मंदिरात दिवंगत राजू श्रीवास्तव यांची श्रद्धांजली सभा होणार आहे. सायंकाळी चार ते 6 यादरम्यान जूहू येथील इस्कॉन मंदिरात सभा होणार आहे. 22 सप्टेंबर रोजी राजू श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला होता.
उपराष्ट्रपती धनखड बीकानेर दौऱ्यावर
उपराष्ट्रपती धनखड आज जयपूरमधील बीकानेर येथे एक दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत. येथील देशनोक मंदिरात ते दर्शन घेणार आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात निर्णायाक लढत -
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज हैदराबाद येथे निर्णायाक सामना होणार आहे. तीन सामन्याची मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. हैदराबाद येथील सामना जिंकून टी 20 मालिका जिंकण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत.