Todays Headline 12th June : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या
Top News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
आज तिथीनुसार शिवराज्यभिषेक
आज तिथीनुसार आज 349 वा शिवराजाभिषेक सोहळा रायगडावर होणार आहे. दुर्गराज संस्थेकडून आयोजित या सोहळ्यात विधीनुसार राज्याभिषेक पार पडेल. यावेळी हजारोच्या संख्येने शिवभक्त सोहळ्याला उपस्थित रहण्याची शक्यता आहे.
रखुमाईच्या पायावर आज लेपन होणार.
विठ्ठल रखुमाईच्या पायावर भक्तांकडून डोकं टेकवल्यामुळे पायाची झीज होत असल्याची माहिती समोरं आली होती. आज पहाटे रखुमाईच्या पायावर लेपन होणार आहे. ही प्रक्रिया साधारण 3 तास चालणार आहे. त्यामुळे देवीचे दर्शन भक्तांना काही दिवस दुरून घ्यावे लागणार आहे. पुरातत्व विभागाची टिम पंढरपुरात दाखल झालीये.
विठ्ठलाच्या पायाची देखील थोडी झीज झाल्याने गरजेनुसार लेपन केलं जाणार आहे.
आज चांगल्या पावसाची शक्यता
महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाच्या घोषणेनंतर राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडतोय. पुढील 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
उद्यापासून देहूचे मंदिर तीन दिवस भाविकांसाठी बंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 तारखेला देहूत येणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर देहूचे मंदिर तीन दिवस भाविकांसाठी बंद रहाणार आहे.
राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांचे कोल्हापुरात जोरदार स्वागत
राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांचे कोल्हापुरात जोरदार स्वागत केले जाणार आहे. ताराराणी चौकातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक अंबाबाई मंदिर जाऊन थांबवली जाणार आहे.
भाजपचे निवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे आज अमरावतीत येणार
भाजपचे निवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे आज अमरावतीत येणार आहेत. यावेळी त्याचं जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे, संध्याकाळी 5 वाजता. त्यापुर्वी नागपुरात अनिल बोंडे संघ मुख्यालय आणि दीक्षाभूमीला भेट देणार आहेत.
गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम वाशिमला
गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. आज पालखी वाशिम मध्ये असणार आहे.
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेतला दुसरा टी- 20 सामना
आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात दुसरा टी20 सामना कटकच्या बाराबती मैदानात खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होणार असून 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होणार आहे. तर या सामन्यात खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावेल.