Todays Headline 11th September : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत
मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आज दिल्लीत अधिवेशन
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आठवे राष्ट्रीय आधिवेशन आज अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. हे आधिवेशन दिल्लीमध्ये होणार असून, या आधिवेशनात 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या आधिवेशनात सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे
क्वीन एलिझाबेथ यांच्या निधनानंतर भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आज भारतात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून सरकारी आणि राष्ट्रीय इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार आहे. तसेच या दिवशी मनोरंजनाच्या कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार नाही.
JEE Advanced परीक्षेचा आज निकाल
IIT मुंबई द्वारे घेण्यात आलेल्या देशातील सर्वात प्रतिष्ठित प्रवेश परीक्षा JEE Advanced चा निकाल 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता जाहीर होणार आहे. JEE Advanced चा निकाल jeeadv.ac.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे
आशिया कप फायनलमध्ये श्रीलंका-पाकिस्तान आमने सामने
श्रीलंका आणि पाकिस्तान(India vs Pakistan) या दोन संघामधील एक जण आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेच्या चषकावर नाव कोरणार आहे. दोन्ही संघाची स्पर्धेतील सुरुवात खास झाली नसतानाही त्यांनी अंतिम सामन्यापर्यंत धडक घेतली आहे. दरम्यान आता आशिया कप फायनलचा महामुकाबला दुबई आंतरराष्ट्रीय मैदानातच (Dubai International Stadium) होणार आहे. उद्या संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे