एक्स्प्लोर
शहीद शुभम मुस्तापुरेवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
शहीद शुभम मुस्तापुरे यांच्यावर परभणी जिल्ह्यातील कोनेरवाडीतं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतून हजारो नागरिक उपस्थित होते.
![शहीद शुभम मुस्तापुरेवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार todays funeral on martyr jawan shubham mustapure शहीद शुभम मुस्तापुरेवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/05174315/PARBHANI-SHAHID-JAWAN-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
परभणी : अवघ्या 20 व्या वर्षी भारतमातेसाठी बलिदान दिलेल्या शहीद शुभम मुस्तापुरे यांच्यावर परभणी जिल्ह्यातील कोनेरवाडीतं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतून हजारो नागरिक उपस्थित होते.
शहीद भुभमचं पार्थिव कोनेरवाडीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. शुभमच्या जाण्यानं मुस्तापुरे परिवारावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
सकाळी 9 वाजता शुभमच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. त्यावेळी ‘शुभम मुस्तापुरे अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. सकाळी 10 वाजता त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिह्यातील कृष्णाघाटीजवळच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सकाळी साडे सातच्या सुमारास गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात एका ऑफिसरसह तीन जवान जखमी झाले होते. तर शुभम मुस्तापूरे यांनाही वीरमरण आलं होतं.
संबंधित बातम्या
पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राच्या 20 वर्षीय सुपुत्राला वीरमरण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)