एक्स्प्लोर

LIVE UPDATES | लातूर जिल्ह्यात आज 9 लोकांना कोरोना पॉझिटिव्ह

देशात पहिल्यांदाच काल, शनिवारी 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार पेक्षा जास्तने वाढ झाली आहे. 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार 516 ने वाढ झाली तर 375 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 95 हजार 048 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 13 हजार 831 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 54.12 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 68 हजार 269 इतके आहेत. गेल्या 24 तासात 9 हजार 120 रुग्ण बरे झाले आहेत तर 375 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण बळींची संख्या 12 हजार 948 इतकी झाली आहे. कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

LIVE UPDATES | लातूर जिल्ह्यात आज 9 लोकांना कोरोना पॉझिटिव्ह

Background

नवी दिल्ली : देशात पहिल्यांदाच काल, शनिवारी 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार पेक्षा जास्तने वाढ झाली आहे. 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार 516 ने वाढ झाली तर 375 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 95 हजार 048 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 13 हजार 831 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 54.12 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 68 हजार 269 इतके आहेत. गेल्या 24 तासात 9 हजार 120 रुग्ण बरे झाले आहेत तर 375 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण बळींची संख्या 12 हजार 948 इतकी झाली आहे.

महाराष्ट्रात काल 3827 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे. राज्यात काल 1935 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 62 हजार 773 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 55 हजार 651 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. सर्वात जास्त ज्यादा ॲक्टिव्ह केसेस महाराष्ट्रात आहेत. यानंतरर दिल्ली, तमिलनाडू, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ॲक्टिव्ह केसेस आहेत. ॲक्टिव्ह केसेसमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

17:48 PM (IST)  •  21 Jun 2020

जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 3 हदशतवाद्यांना कंठस्नान
21:55 PM (IST)  •  21 Jun 2020

लातूर जिल्ह्यात आज 131 लोकांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 9 लोकांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. आज उपचार घेत असलेले तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
17:46 PM (IST)  •  21 Jun 2020

कुरुक्षेत्र, सूतरगढ, सिरसा आणि लखनऊमध्ये रिंग ऑफ फायर, नेपाळ, ओमान, दुबईतही सूर्यग्रहणाचं दर्शन, पंढरपुरात विठुरायाला चंद्रभागेच्या जलाचा अभिषेक
20:08 PM (IST)  •  21 Jun 2020

हिंगोलीत पेरणीचे काम आटोपून घराकडे परतणाऱ्या बैलगाडीला भरधाव ट्रकने चिरडले. हिंगोली ते नांदेड रोडवर कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या सावा फाटी दरम्यान ही घटना घडली. यामध्ये एका 16 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झालाय तर बैलगाडी मध्ये बसलेली इतर चारं जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
17:59 PM (IST)  •  21 Jun 2020

पुण्याच्या हडपसर परिसरात पूर्ववैमनस्यातून एकाला कपडे फाडून बेदम मारहाण करण्यात आली. हडपसर परिसरातील भिमाले हाईट्स या इमारतीत हा प्रकार घडला. ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. याप्रकरणी संदीप विठ्ठलराव भोईटे यांनी तक्रार दिली आहे.
16:01 PM (IST)  •  21 Jun 2020

चंद्रपूर-नागपूर मार्गावर मांगली जवळ भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त अर्टीगा गाडीचा टायर फुटल्याची प्राथमिक माहिती. नागपूरवरून चंद्रपूरकडे जाणारी ही गाडी अतिशय वेगात होती आणि त्यामुळे टायर फुटल्यावर नियंत्रित झाली नाही आणि किमान 100 फूट घासत गेली.
12:36 PM (IST)  •  21 Jun 2020

जीवंत वीज वाहिनीचा स्पर्श झाल्याने 5 म्हशींचा मृत्यू झाला आहे. अलिबाग तालुक्यातील आवास येथे ही घटना घडली. आवास ते किहीम दरम्यानच्या जंगलात चरण्यासाठी गेल्या असताना म्हशींचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.
12:34 PM (IST)  •  21 Jun 2020

हिंगोली जिल्ह्यातील जगप्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग नागेश दारुकावन तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ या पावन नगरीत डोगराच्या पर्वतरांगामध्ये दगडाच्या कोरीवशिल्पकलेचे पांडव कालीन हेमांडपंथी श्री नागनाथ देवाचे मंदीर आहे. श्री नागनाथ मंदिर कोरोना पार्श्वभूमीवर बंद आहे. आज सूर्यग्रहण असल्यामुळे नागनाथ देवाची पिंड ही पांढरे शुभ्र धोतराचे वस्त्र ओले करून श्रीच्या पिंडवर ठेवण्यात आली आहे. तसेच श्रींच्या पिंडीवर सतत पाण्याची धार ठेवलीय. सूर्यग्रहण संपेपर्यंत देवाचा अंगावर सतत पाण्याची धार ठेवणे, महादेवाची पिंड ओल्या वस्त्रामध्ये झाकून ठेवण्यात आलेली आहे. अशी माहिती मुख्य पुजारी हरिहर भोपी यांनी दिलीय. सूर्यग्रहणामध्ये देवाच्या पिंडीला ओले ठेवणे शास्त्रीय कारण आहे. सूर्यग्रहण हे दहा ते दोन या वेळेत असून या वेळामध्ये मुख्य पुजारी हे ओम नमः शिवायचा जप करत आहेत.
12:31 PM (IST)  •  21 Jun 2020

सुर्यग्रहणामुळे बेळगाव शहरातील रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता.रस्ते निर्मनुष्य झाले होते.अनेक मंदिरात ग्रहणानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील बाजारपेठेत दुकाने उघडी होती. पण ग्राहक खरेदीसाठी बाजारपेठेत फिरकलेच नाहीत.सुर्यग्रहणामुळे जनतेने घरीच बसणे पसंद केले.रविवारी परगावचे लोक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर येतात पण आज परगावचे लोकही आलेच नाहीत.अनेक ठिकाणी परातीत ग्रहण काळात मुसळ उभे करण्यात आले होते. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात नवग्रह यज्ञ आणि रुद्र पठण करण्यात आले होते. ग्रहण काळात अनेकांनी भिक्षुकाना दान केले.शहरात बससेवा सुरू होती. पण बसमध्ये प्रवासी तुरळक होते.नेहमी प्रवाशांनी गजबजलेल्या मध्यवर्ती बस स्थानकावर देखील शुकशुकाट होता.
12:06 PM (IST)  •  21 Jun 2020

पुण्यात रात्रभरात 179 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, पुण्यातील रुग्णांची एकूण संख्या 15183 तर आत्तापर्यंत 584 कोरोना बाधितांचा मृत्यू, एकूण 9257 रुग्णांना डिस्चार्ज
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Bangar : हिंगोलीत नरेंद्र मोदींची सभा झाल्यास शिवसेनेचे हेमंत पाटील चार लाखांनी निवडून येणार: संतोष बांगर
हिंगोलीत नरेंद्र मोदींची सभा झाल्यास शिवसेनेचे हेमंत पाटील चार लाखांनी निवडून येणार: संतोष बांगर
Congress Income Tax Notice : भर निवडणुकीत खातं गोठवलेल्या काँग्रेसला पुन्हा आयकर विभागाची नोटीस, तब्बल 1700 कोटींचा दंड!
भर निवडणुकीत खातं गोठवलेल्या काँग्रेसला पुन्हा आयकर विभागाची नोटीस, तब्बल 1700 कोटींचा दंड!
Sharad Pawar on Satara Loksabha : श्रीनिवास पाटलांची सातारच्या रिंगणातून माघार, शरद पवारांनी चार नावे सांगितली! कोणाला संधी मिळणार?
श्रीनिवास पाटलांची सातारच्या रिंगणातून माघार, शरद पवारांनी चार नावे सांगितली!
Prakash Ambedkar : भाजपविरोधात मजबूत आघाडी कशी उभारणार? प्रकाश आंबेडकरांनी सांगितला मेगा प्लॅन, संजय राऊतांवरही डागली तोफ!
भाजपविरोधात मजबूत आघाडी कशी उभारणार? प्रकाश आंबेडकरांनी सांगितला मेगा प्लॅन, संजय राऊतांवरही डागली तोफ!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune : सलग तीन सुट्यांचा लोकसभेतील उमेदवारांनी घेतला लाभ, Amol Kolhe यांच्याकडून जोरदार प्रचारSharad Pawar Full PC : साताऱ्याचा उमेदवार 2  ते 3 दिवसांत जाहीर करणार, शरद पवारांची घोषणाTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 29 March 2024 : ABP MajhaSwatantra Veer Savarkar Movie :  स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाच्या स्क्रिनिंगवरुन  मनसे आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Bangar : हिंगोलीत नरेंद्र मोदींची सभा झाल्यास शिवसेनेचे हेमंत पाटील चार लाखांनी निवडून येणार: संतोष बांगर
हिंगोलीत नरेंद्र मोदींची सभा झाल्यास शिवसेनेचे हेमंत पाटील चार लाखांनी निवडून येणार: संतोष बांगर
Congress Income Tax Notice : भर निवडणुकीत खातं गोठवलेल्या काँग्रेसला पुन्हा आयकर विभागाची नोटीस, तब्बल 1700 कोटींचा दंड!
भर निवडणुकीत खातं गोठवलेल्या काँग्रेसला पुन्हा आयकर विभागाची नोटीस, तब्बल 1700 कोटींचा दंड!
Sharad Pawar on Satara Loksabha : श्रीनिवास पाटलांची सातारच्या रिंगणातून माघार, शरद पवारांनी चार नावे सांगितली! कोणाला संधी मिळणार?
श्रीनिवास पाटलांची सातारच्या रिंगणातून माघार, शरद पवारांनी चार नावे सांगितली!
Prakash Ambedkar : भाजपविरोधात मजबूत आघाडी कशी उभारणार? प्रकाश आंबेडकरांनी सांगितला मेगा प्लॅन, संजय राऊतांवरही डागली तोफ!
भाजपविरोधात मजबूत आघाडी कशी उभारणार? प्रकाश आंबेडकरांनी सांगितला मेगा प्लॅन, संजय राऊतांवरही डागली तोफ!
Latur Lok Sabha: ठाकरेंच्या माजी आमदाराची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी, अशोक चव्हाण, अजित पवारांवर बोचरी टीका
ठाकरेंच्या माजी आमदाराची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी, अशोक चव्हाण, अजित पवारांवर बोचरी टीका
Kartiki Gaikwad Pregnancy News :'लिटिल चॅम्प'च्या घरी पाळणा हलणार; इवलुशा पावलांनी नवा पाहुणा घरी येणार, सोशल मीडियावर Video VIRAL
'लिटिल चॅम्प'च्या घरी पाळणा हलणार; इवलुशा पावलांनी नवा पाहुणा घरी येणार, सोशल मीडियावर Video VIRAL
Uddhav Thackeray on Kalyan Loksabha : कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
Jyoti Mete : ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या, उमेदवारीवर काय निर्णय झाला?
ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या; बीडमधून उमेदवारीवर कोणता निर्णय झाला?
Embed widget