LIVE UPDATES | उद्धव ठाकरे सरकारचं बहुमत सिद्ध

Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर..
1. विधानसभेत ठाकरे सरकारची आज बहुमत चाचणी, हंगामी अध्यक्ष म्हणून वळसे-पाटलांची नियुक्ती, विरोधी पक्षनेतेपदी फडणवीसांची नेमणूकही आजच होणार
2. उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच तर विधानसभाध्यक्षपद काँग्रेसकडे, अजित पवारांच्या दाव्याला जयंत पाटलांचीही पुष्टी, काँग्रेस नेत्यांकडून मात्र प्रतिक्रिया नाही
3. मेट्रो आरे कारशेडच्या कामाला स्थगिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, तर प्रकल्पांबाबत सरकार गंभीर नाही, देवेंद्र फडणवीसांची टीका
4. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला, हुतात्मा स्मारक, छत्रपती शिवराय आणि आंबेडकरांना वंदन करुन कामाला सुरुवात, मंत्रालयात अभूतपूर्व स्वागत
5. मोदी-शाह जोडीने एक फोन केला असता तर युती टिकली असती, 'एबीपी माझा'च्या कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊतांची खंत
6. देशाच्या जीडीपीत अभूतपूर्व घसरण, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी पाचवरुन साडे चार टक्क्यांवर, अर्थतज्ज्ञांकडून चिंता व्यक्त























