शिवाजीराव गर्जे आणि अदिती नलावडे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर, राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून उद्या शपथ घेणार
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
दिवसभरातील घडामोडींचा वेगवान आढावा...
1. नागरिकत्व कायद्याविरोधात राज्यभरात एल्गार, ऑगस्ट क्रांती मैदानात डाव्या संघटनांचं केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन, ठिकठिकाणी विद्यार्थ्यांकडूनही निषेध
2. विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाचा चौथा दिवस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देणार, शेतकऱ्यांबद्दल घोषणा करणार का? याकडे राज्याचं लक्ष
3. नाराज खडसे तूर्तास भाजप सोडणार नसल्याचं स्पष्ट, नागपुरात पवारांची भेट घेतली नसल्याचाही दावा, तर खडसे-पवार भेट झाल्याची मलिकांची माहिती
4. मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महाविकासआघाडीच्या प्रयोगाचे पवारांकडून संकेत, भाजपला दुसरा धक्का देण्यासाठी रणनिती
5. रेशन दुकानावर मटण, चिकन, आणि मासे विकण्याचा केंद्राचा मानस, गरिबांना स्वस्तात प्रथिनयुक्त पदार्थ मिळावेत म्हणून प्रस्ताव, अद्याप अंतिम निर्णय नाही
6. दुसऱी वन डे जिंकून टीम इंडियाची मालिकेत बरोबरी; रोहित शर्मा आणि लोकेश राहुलची शतकं, कुलदीप यादवची हॅटट्रिक साजरी