(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE UPDATES | नोटाबंदीनंतर राज्यात 317 कारखान्यांना टाळे ; तर 14, 787 कामगारांना फटका
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. महाविकास आघाडीचं सरकार दुर्दैवी, मटा फेस्टिव्हलमधल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं टीकास्त्र, पक्षांतर करणाऱ्यांना जनतेनं धडा शिकवल्याचंही वक्तव्य
2. दिल्लीतल्या दंगलीमागे भाजपाचा हात, मुंबईतल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांचा घणाघात, सत्ता कायम ठेवण्यासाठी वातावरण बिघडवल्याचा गंभीर आरोप
3. मुंबई महापालिका निवडणुकीवरुन राष्ट्रवादी-भाजपा आमनेसामने, राष्ट्रवादीच्या मिशन मुंबईवर भाजपची टीका, रोहित पवारांकडून आशिष शेलारांना प्रत्युत्तर
4. 26 वर्ष लोकांचं प्रबोधन केलं, आता रडण्याची वेळ आलीय, इंदोरीकर महाराजांची उद्विग्न प्रतिक्रिया, वादाच्या पार्श्वभूमीवर कीर्तन रेकॉर्ड करण्यास मनाई
5. मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात काल पुन्हा अवकाळी पाऊस, परभणीत विजांच्या कडकटासह पावसाच्या सरी, गहू हरभरा आणि फळबागांचं नुकसान
6. एकतर्फी प्रेमातून तरुणीसमोर तरुणाचा गोळीबार, पुणे ग्रामीण पोलिसांनी पाठलाग करुन आरोपीला बेड्या ठोकल्या, जुन्नर तालुक्यातील रविवारची घटना
एबीपी माझा वेब टीम