एक्स्प्लोर
सुधीर मुनगंटीवारांनी मागितली उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ
नाणार प्रकल्पाला होत असलेला कडवा विरोध, वर्षभरावर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केलेली सत्ताधाऱ्यांची कोंडी, युतीची चर्चा या पार्श्वभूमीवर ही मुनगंटीवारांनी मागितलेली वेळ अत्यंत महत्वाची मानली जाते आहे.
मुंबई : आगामी निवडणुका डोळ्यासंमोर ठेवून भाजप आणि शिवसेनेतील युतीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट होण्याची शक्यता आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. अद्याप भेट निश्चित झाली नाही. मात्र उद्धव ठाकरेंकडून भेटीसाठी वेळ दिला गेल्यास, संध्याकाळी पाच वाजता ‘मातोश्री’वर या दोघांचीही भेट होईल.
नाणार प्रकल्पाला होत असलेला कडवा विरोध, वर्षभरावर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केलेली सत्ताधाऱ्यांची कोंडी, युतीची चर्चा या पार्श्वभूमीवर ही मुनगंटीवारांनी मागितलेली वेळ अत्यंत महत्वाची मानली जाते आहे.
याआधीच शिवसेनेनं भविष्यात भाजपशी कुठलीही युती करणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता या भेटीत नेमकं काय गुफ्तगू होतं याकडे दिल्लीचंही लक्ष लागलं आहे.
कालच डोंबिवलीतील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते, 'भाजपनं आमचा मुका घेतला तरी, आता युती होणार नाही,' तसेच, शिवसेना सत्ताधारी नसून फक्त टेकूधारी आहे, आणि राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी सत्तेत असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला होता.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मेळाव्यातूनच जाहीर केले आहे की, आगामी सर्व निवडणुका शिवेसना स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आपल्या वक्तव्यावर ठाम राहतात की भाजप त्यांना निर्णय बदलायला लावते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आता सुधीर मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट होते का आणि भेट झाल्यास त्यात नक्की काय चर्चा होते, याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement