Lata Mangeshkar Critical : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नितीन गडकरी ब्रीच कँडी रुग्णालयात जाणार
आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात जाणार आहेत. सकाळी नऊ वाजता गडकरी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचणार आहेत.
![Lata Mangeshkar Critical : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नितीन गडकरी ब्रीच कँडी रुग्णालयात जाणार Today Nitin Gadkari will visit Breach Candy Hospital to inquire about Lata Mangeshkar condition Lata Mangeshkar Critical : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नितीन गडकरी ब्रीच कँडी रुग्णालयात जाणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/11/05713dbb3b62bb20d48c1994e3b2d416_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल अनेक राजकीय नेत्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात जाणार आहेत. सकाळी नऊ वाजता गडकरी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचणार आहेत.
दरम्यान, लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्यावर अनेक मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रुग्णालयात जाऊन लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. पीयूष गोयल हे शनिवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात पंतप्रधानांचा संदेश घेऊन पोहोचले होते. त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांचा संदेश दिला. पंतप्रधानांनी लता दीदींच्या कुटुंबीयांना संदेश दिला आहे की,"लता दीदींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत".
कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, काल अचानक त्यांची प्रकृती बिघडली आहे. लता मंगेशकर यांचे वय 92 वर्ष आहे. 92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. लता दीदींना आपल्या घरातूनच गायनाचा वारसा मिळाला आहे. त्यांनी अवघ्या 5 वर्षाच्या वयात आपल्या वडीलांकडून संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)