एक्स्प्लोर

Congress vs BJP : काँग्रेसच्या आंदोलनाला भाजप जशास तसे उत्तर देणार, फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर संघर्ष होण्याची चिन्हे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या निवासस्थानासमोर आज काँग्रेस आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला भाजपने जशास तसे उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे.

Congress vs BJP : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आज आंदोलन करणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या निवासस्थानासमोर काँग्रेस आंदोलन करणार आहे. पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या  महाराष्ट्राचा अपमान केला असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपने माफी मागावी, यासाठी नाना पटोलेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र, भाजपने देखील काँग्रेस नेत्यांना आव्हान दिले आहे. या आंदोलनाला भाजपने जशास तसे उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये आज राडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेसच्या आंदोलनाआधीच भाजप नेत्यांनी काँग्रेसला आव्हान दिलं आहे. काँग्रेसच्या आंदोलनाला भाजप जशास तसे उत्तर देणार आहे. काँग्रेसच्या देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होणाऱ्या आंदोलनाला भाजपची उत्तर देण्याची तयारी केली आहे. भाजप नेते आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते उत्तर देणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानाबाहेर संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.

काँग्रेसच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर भाजप देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसने खरंच हिंमत असेल तर फडणवीसांच्या बंगल्याबाहेर आंदोलनाला येऊन दाखवावे, त्यांना भाजप कार्यकर्ते प्रत्युत्तर देतील, असा इशारा भाजप नेत्यांकडून देण्यात आला आहे. नाना पटोले यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस उद्या सकाळी 11 वाजता फडणवीसांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणार आहे. यावेळी काँग्रेस आणि भाजप यांच्यात मोठा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप नेते प्रसाद लाड यांनी ट्विटरवर त्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत त्यांना नाना पटोले यांना प्रतिआव्हान दिलं आहे. 'नाना तुझ्या आव्हानाला प्रतिआव्हान देतोय. हिंमत असेल तर उद्या सकाळी दहा वाजता येऊनच दाखल. नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्हीदेखील भाजपवासी नाही! सागरवर तू ये पाहतो मी तू कसा जातो त', असं प्रसाद लाड म्हणाले आहेत. प्रसाद लाड यांनी पटोलेंना इशाराच दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Chaudhari: भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी
भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Nashik And Raigad Guardian Minister Name: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Embed widget