एक्स्प्लोर

खेकड्यांनी तिवरे धरण फोडलं, 'पुणे कालवाफुटीच्या थिअरी'ची जलसंधारण मंत्र्यांकडून पुनरावृत्ती

खेकड्याने भिंत पोखरल्याची थेअरी शिवसेना आमदाराला वाचवण्यासाठी नाही, मला जे ग्रामस्थांनी सांगितलं, तेच मी सांगत असल्याची पुस्तीही तानाजी सावंत यांनी जोडली.

सोलापूर : खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे तिवरे धरण फुटलं, असं ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांचं मत असल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण या घटनेला जबाबदार नसल्याचं सांगत सावंत यांनी चव्हाणांची पाठराखण केली. तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेनंतर आतापर्यंत वीस जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर काही जण अद्यापही बेपत्ता आहेत. पुण्यात मुठा नदीच्या कालव्याची भिंत फुटून झालेल्या अपघाताचं खापरही त्यावेळी उंदीर आणि खेकड्यांवरच फोडण्यात आलं होतं. त्या प्रकाराची पुनरावृत्ती यावेळी होताना दिसत आहे. धरणफुटीच्या घटनेला 48 तास उलटून गेल्यानंतरही अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही? या प्रश्नावर 'गुन्हा कोणावर दाखल करणार?' असा उलटा प्रश्न तानाजी सावंतांनी केला. गुन्हा दाखल होण्यास 2-3 महिने लागतील, अशी माहिती त्यांनी दिली. समिती नेमलेली असून चौकशी झाल्यावर आरोप निश्चित होतील, असं ते म्हणाले. खेकड्याने भिंत पोखरल्याची थेअरी शिवसेना आमदाराला वाचवण्यासाठी नाही, मला जे ग्रामस्थांनी सांगितलं, तेच मी सांगत असल्याची पुस्तीही तानाजी सावंत यांनी जोडली. 'माझं आमदार सदानंद चव्हाण यांच्याशी बोललो आहे. त्यांचं म्हणणं आहे अचानक पाण्याच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे हे झालं. 2004 ला हॅन्डओव्हर झाल्याने चव्हाणांचा यात संबंध नाही' असं म्हणत सावंतांनी त्यांची पाठराखण केली. आमचा पक्ष सेन्सिटिव्ह असल्याने सगळ्यात आधी आम्ही पोहचलो. आम्ही कोणाला पाठीशी घालणार नाही, असं सांगायलाही ते विसरले नाहीत. सदानंद चव्हाण हेच तिवरे धरणाचे ठेकेदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. नैतिक जबाबदारी घेऊन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधीपक्षाने केली. चिपळूणमधील तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत गावकऱ्यांनी तक्रार केल्याची कबुली महाजन यांनी दिली होती. तिवरे धरण हे दापोली लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येतं. 2000 साली या धरणांचं बांधकाम पूर्ण झालं. 20 लाख क्युबिक मीटर पाणीसाठा मावेल एवढी या धरणाची क्षमता आहे. परंतु मागील काही वर्षात या धरणाची दुरुस्ती झालेली नाही. अनेक गावांना या धरणाच्या पाण्याचा पिण्यासह शेतीसाठी उपयोग होतो. दोन वर्षांपूर्वी धरणाला गळती लागली होती, पण गेल्या वर्षी गळतीत वाढ झाली.

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget