एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

शरद पवारांच्या निर्णयावर 'या' तीन तरुण नेत्यांचं राजकीय करिअर अवलंबून

आपल्याच पक्षातील नाही तर इतर पक्षातील तरुण नेत्यांना देखील त्यांचं मार्गदर्शन मिळतं. त्यांनी आपल्या दूरदृष्टीने आजवर अनेकांची राजकीय करिअर घडली आहेत. आजही तीन नवीन तरुण चेहऱ्यांना 2019 लोकसभा निवडणुकीत संधी मिळणार का हे पण पवार 'आजोबां'च्या निर्णयावर अवलंबून आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे आजही सगळ्यात ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद मिळाला की महाराष्ट्रातील राजकारणात तुमची नैय्या पार पडणार. सध्या राज्यातील तीन तरुण नेत्यांचं राजकीय करिअर शरद पवार यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. केवळ आपल्याच पक्षातील नाही तर इतर पक्षातील तरुण नेत्यांना देखील त्यांचं मार्गदर्शन मिळतं. त्यांनी आपल्या दूरदृष्टीने आजवर अनेकांची राजकीय करिअर घडली आहेत. आजही तीन नवीन तरुण चेहऱ्यांना 2019 लोकसभा निवडणुकीत संधी मिळणार का हे पण पवार 'आजोबां'च्या निर्णयावर अवलंबून आहे. ही तीन नावं म्हणजे मावळमधून अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार, दक्षिण अहमदनगर मधून राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील आणि बुलडाणामधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर. पवार आजोबांनी मात्र नातवाच्या एंट्रीला ब्रेक मारला? मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मतदारसंघात फिरायला सुरुवात केली होती. लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघ निहाय बैठकीत पार्थ पवार यांचं नाव देखील चर्चेत आलं होतं. पण पवार आजोबांनी मात्र नातवाच्या या एंट्रीला ब्रेक मारला. शरद पवारांच्या निर्णयावर 'या' तीन तरुण नेत्यांचं राजकीय करिअर अवलंबून पहिल्याच बैठकीत पवार घरातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर कार्यकर्ते काय करणार? असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतरही पार्थ पवार यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. प्रसारमाध्यमात चर्चा होत असल्याने पवारांनी ते आणि सुप्रिया सुळे फक्त लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे पार्थ पवारांच्याया उमेदवरीबाबत प्रश्नचिन्ह कायम राहिले आहे. सुजय विखे पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीलाच  संघर्ष दुसरा तरुण चेहरा डॉ. सुजय विखे पाटील. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र आणि बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू. बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांचं वैर साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. 1991 मध्ये दक्षिण अहमदनगर जागेच्या निवडणुकीवरून सुरु झालेलं वैर कदाचित अजूनही संपलेलं नाही. कारण दक्षिण नगरच्या जागेबाबत अजून शरद पवार निर्णय घ्यायला तयार नाहीत. शरद पवारांच्या निर्णयावर 'या' तीन तरुण नेत्यांचं राजकीय करिअर अवलंबून ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे, पण काँग्रेसलाही जागा हवी आहे. डॉ.सुजय विखे पाटील यांनी तयारी देखील केली आहे. मात्र अजूनही राष्ट्रवादी या जागेबाबत निर्णग घ्यायला तयार नाही. त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीलाच हा संघर्ष सुरू झाला आहे. आता पवारांच्या निर्णयानंतरच पुढे सुजयला नेमकी निवडणूक कशी लढवायची हा निर्णय घ्यावा लागेल. रविकांत तुपकरांची बुलडाणा लोकसभा लढवण्याची तयारी तिसरा युवा नेता म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर. दिल्लीत राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या विषयावर आक्रमक होत असताना राज्यात पक्षाची धुरा सांभाळणारं तरुण नेतृत्व म्हणजे रविकांत तुपकर. रविकांत तुपकरांनी बुलडाणा लोकसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. शरद पवारांच्या निर्णयावर 'या' तीन तरुण नेत्यांचं राजकीय करिअर अवलंबून याआधी युतीत असताना महामंडळ मिळूनही रविकांत यांनी शेट्टींच्या बंडानंतर महामंडळ सोडलं.  आता लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली तर बुलडाणा जागेची तयारी त्यांनी केली आहे. ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. त्यामुळे पवारांनी बुलढाणा जागा स्वाभिमानीला सोडली तरच याही युवा नेत्याला महाआघाडीकडून निवडणूक लढवायची संधी मिळणार आहे. राज्यातील अनेक पुतण्यांना या काकांनी आपल्या पंखाखाली घेतलं आहे. आता या मुलांना आजोबा बळ देणार काय? हे देखील काही दिवसात कळेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaVinesh Phogat: विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपटABP Majha Headlines : 11 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सHaryana Assembly Election Result 2024 : हरियाणा सेट, महाराष्टात इफेक्ट होणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Embed widget