एक्स्प्लोर
महाराष्ट्रात 2016 मध्ये 3 हजार 52 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
उस्मानाबाद : राज्यातील शेतकरी आत्महत्यांबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जानेवारी ते डिसेंबर 2016 या कालावधीत महाराष्ट्रातील 3 हजार 52 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.
राज्य मदत आणि पुनर्वसन खात्याकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या 3 हजार 52 शेतकऱ्यांपैकी 1 हजार 621 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.यापैकी 1 हजार 167 प्रस्ताव अपात्र ठरवण्यात आले असून 264 प्रस्तावांची चौकशी सुरु आहे.
विभागनिहाय आकडेवारी
अमरावती 1085
औरंगाबाद 1053
नाशिक 479
नागपूर 360
पुणे 75
कोकण 0
मराठवाड्यात 2015 पाठोपाठ 2016 मध्येही शेतकरी आत्महत्यांनी एक हजारचा आकडा पार केला आहे. 1 जानेवारी ते 12 डिसेंबर 2016 या काळात तब्बल 1003 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आली होती.
2016 मध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा वाढला नसला तरी देखील ही अत्यंत चिंतेची बाब मानली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
करमणूक
नाशिक
Advertisement